-
झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला कार्यक्रम म्हणजे ‘बस बाई बस’.
-
आतापर्यंत खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली. आता माजी महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
-
‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये त्या अनेक राजकीय विषयांवर देखील भाष्य करताना दिसतील.
-
त्यांचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे राजकारणाशी निगडीत काही प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारताना दिसत आहे.
-
यावेळी खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का? असा प्रश्न सुबोध भावेने किशोरी पेडणेकर यांना विचारला.
-
यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
-
त्या म्हणाल्या, “हो. गेल्यावर्षीपासूनच खड्डेमुक्त मुंबई होण्यास सुरुवात झाली आहे.”
-
“गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मुंबईमध्ये खड्डे नाहीत.” असं किशोरी यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं.
-
तसेच त्यांनी शिवसेना पक्ष, गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी यावर देखील भाष्य केलं.
-
पण खरंच मुंबई खड्डेमुक्त झाली आहे का? हा चर्चेचा विषय आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
खड्डेमुक्त मुंबई शक्य आहे का? किशोरी पेडणेकर म्हणतात, “यावर्षी मुंबईमध्ये खड्डे…”
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.
Web Title: Kishori pednekar bus bai bus zee marathi show talk about mumbai pothole see details kmd