• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. former mayor and shivsena leader kishori pednekar at bus bai bus show talk about cm eknath shinde deputy cm devendra fadnavis photos kak

Photos: ‘क्या हुआ तेरा वादा’ला आठवले CM शिंदे, ‘दोस्त दोस्त ना रहा’वर फडणवीस तर ‘दिस येतील’वर…; किशोरी पेडणेकरांची भन्नाट निवड

किशोरी पेडणेकरांनी कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अगदी दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली.

Updated: August 27, 2022 17:20 IST
Follow Us
  • kishori pednekar at bus bai bus show
    1/15

    झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 2/15

    अभिनेता सुबोध भावे सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली.

  • 3/15

    कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली.

  • 4/15

    ‘बस बाई बस’ कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांना काही गाणी ऐकवण्यात आली. ही गाणी ऐकल्यानंतर कोणाचा चेहरा समोर येतो हे त्यांना सांगायचे होते.

  • 5/15

    ‘कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’ हे गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कोण आठवलं, असं सुबोध भावेने त्यांना विचारलं.

  • 6/15

    हे गाणं ऐकताच भाजपाच्या चित्रा वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचं किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं.

  • 7/15

    त्यानंतर त्यांना ‘जाने कहॉं गए वो दिन’ हे गाणं ऐकवण्यात आलं. यावर त्यांनी “आमच्या पक्षातील मनोहर जोशी”, असं उत्तर दिलं.

  • 8/15

    ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं ऐकताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवल्याचे सांगितल्यावर एकच हशा पिकला.

  • 9/15

    पुढे त्यांना ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गाणं ऐकवण्यात आलं. गाणं ऐकल्यानंतर त्या हसल्या.

  • 10/15

    नंतर उत्तर देत म्हणाल्या, “आत्ताच्या घडामोडीनुसार नाना पटोलेंचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कारण ते ओझं न घेता कामात वाहून घेतात”.

  • 11/15

    ‘दिस येतील दिस जातील’ हे गाणं ऐकल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 12/15

    या खेळाच्या शेवटी त्यांना ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं ऐकवण्यात आलं.

  • 13/15

    गाणं ऐकून क्षणभरही विचार न करता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”.

  • 14/15

    यावर सुबोध भावेनही त्यांना तुम्हाला विचारही करावा लागला नाही. गाण्याचा पहिला शब्द ऐकल्यानंतर लगेचच नाव तुमच्या डोळ्यासमोर आल्याचं म्हटल्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला.

  • 15/15

    (हेही पाहा : सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो पाहताच लाजली पूजा सावंत, म्हणाली “मला लग्न…”)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकिशोरी पेडणेकरKishori Pednekarदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Former mayor and shivsena leader kishori pednekar at bus bai bus show talk about cm eknath shinde deputy cm devendra fadnavis photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.