• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these bollywood celebrities ruined their own acting career because of their big mistakes avn

Photos : या १२ बॉलिवूड कलाकारांची कारकीर्द केवळ त्यांच्याच एका चुकीमुळे संपुष्टात आली

या कलाकारांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.

August 29, 2022 10:26 IST
Follow Us
  • १) शक्ति कपूर हे चित्रपटसृष्टीतलं एक खूप मोठं नाव आहे. वेगवेगळ्या चित्रपटात अभिनय केलेल्या शक्ति कपूर यांच्यावर कास्टिंग काउचचा आरोप लागला होता. एका स्टींग ऑपरेशनमध्ये ते अडकले आणि त्यानंतर ते चित्रपटांपासून बरेच दूर गेले.
    1/12

    १) शक्ति कपूर हे चित्रपटसृष्टीतलं एक खूप मोठं नाव आहे. वेगवेगळ्या चित्रपटात अभिनय केलेल्या शक्ति कपूर यांच्यावर कास्टिंग काउचचा आरोप लागला होता. एका स्टींग ऑपरेशनमध्ये ते अडकले आणि त्यानंतर ते चित्रपटांपासून बरेच दूर गेले.

  • 2/12

    २) विवेक ओबेरॉय आणि सलमान खान प्रकरण चांगलंच गाजलं होतं. ऐश्वर्याशी जवळीक वाढल्याने सलमानने आपल्याला फोन करून धमकावलं हे विवेक ओबेरॉयने पत्रकारांना सांगितलं आणि त्यानंतर विवेक ओबेरॉय हा जणू चित्रपटसृष्टीतून गायबच झाला.

  • 3/12

    ३) बॉलिवूडमध्ये चांगलं करियर सेट होत असताना शायनी आहुजावर त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप लावला आणि शायनीची कारकीर्द तिथेच संपली.

  • 4/12

    ४) शाहरुख खानचा आवाज म्हणून गायक अभिजीत भट्टाचार्य चांगलाच लोकप्रिय होता. केवळ इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल चुकीची वक्तव्यं दिल्याने अभिजीतला कामं मिळणं बंद झाली.

  • 5/12

    ५) टेलिव्हिजन आणि चित्रपटात नाव कमावणाऱ्या अमन वर्माही एका स्टींग ऑपरेशनमध्ये अडकला आणि त्याची कारकीर्द संपुष्टात आली.

  • 6/12

    ६) ८० चा काळ गाजवणारा गोविंदा कुणाला माहीत नाही. अभिनयाचं दुकान चांगलं सुरू असताना त्याने राजकारणात जायचं ठरवलं आणि तिथेच त्याच्या चित्रपटविश्वातील कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. नंतर गोविंदाने पुन्हा चित्रपटात यायचा प्रयत्न केला पण तोवर सगळंच चित्र बदललं होतं.

  • 7/12

    ७) फरदीन खानला एकदा विमान तळावर कोकेनसह पकडण्यात आलं. या घटनेनंतर मात्र फरदीन खान पुन्हा फारसा चित्रपटात दिसला नाही.

  • 8/12

    ८) ‘राम तेरी गंगा मैली’मधून प्रेक्षकांना घायाळ करणारी मंदाकिनी सगळ्यांनाच आठवत असेल. सगळं सुरळीत सुरू असताना तिचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमबरोबरचे फोटोज बाहेर आले आणि मंदाकिनी ही नाव पुन्हा कधीच दिसलं नाही.

  • 9/12

    ९) आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजासाठी लोकप्रिय असलेल्या ममता कुलकर्णीचं नाव एका ड्रग्स केसमध्ये अडकलं आणि तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली.

  • 10/12

    १०) मॉडेल आणि अभिनेत्री मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांचे सबंध जसे उघडकीस आले तशी मोनिका बेदी चित्रपटसृष्टीबाहेर फेकली गेली. नंतर तिने बिग बॉससारख्या कार्यक्रमातून पदार्पण करायचा प्रयत्न केला.

  • 11/12

    ११) एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयराला ही दारूच्या आहारी गेली ज्यामुळे तिला नंतर चित्रपट मिळायचे बंद झाले. नंतर तिला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला, पण त्यातून ती सुखरूप बाहेर आली आहे.

  • 12/12

    १२) ‘मकडी’, ‘इकबाल’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांवर छाप पडणारी श्वेता प्रसाद या अभिनेत्रीचं नाव एका वैश्याव्यवसायाच्या केसमध्ये आलं आणि त्यानंतर तिची अभिनयातील कारकीर्द पूर्णपणे संपली. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These bollywood celebrities ruined their own acting career because of their big mistakes avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.