• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kon banega crorepati 14 questions list amitabh bachchan hrc

KCB: यंदा ‘या’ प्रश्नांची उत्तरं न आल्याने स्पर्धकांनी सोडला खेळ; यापैकी किती उत्तरं तुम्हाला माहितीये?

काही सोप्या प्रश्नांची उत्तर देता न आल्याने स्पर्धकांना खेळ सोडावा लागला. यातील काही प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: August 30, 2022 14:22 IST
Follow Us
  • amitabh bachachan
    1/24

    ‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे.

  • 2/24

    हा शो ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन होस्ट करतात.

  • 3/24

    दरवर्षी अनेक स्पर्धक या शोच्या हॉटसीटवर आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात

  • 4/24

    यंदा १४ व्या हंगामात या शोमध्ये अनेक स्पर्धक हॉटसीटपर्यंत पोहोचले. परंतु काही सोप्या प्रश्नांची उत्तर देता न आल्याने त्यांना खेळ सोडावा लागला. यातील काही प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • 5/24

    यापैकी कोणता सन्मान 2000 सालानंतर कोणालाही देण्यात आलेला नाही?
    A. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, B. युद्ध सेवा पदक, C. इंदिरा गांधी पुरस्कार, D. परमवीर चक्र

    बरोबर उत्तर: परमवीर चक्र

  • 6/24

    यापैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ ‘राजस्थान के पहाडी किल्ले’ चा भाग नाही?
    A. लोहगड, B. चित्तोडगड, C. कुंभलगड, डी. जैसलमेर

    बरोबर उत्तर- लोहगड

  • 7/24

    महालनोबिस अंतराची रचना करणाऱ्या पीसी महालनोबिस यांनी १९३१ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली?
    A. IIT खरगपूर, B. IISc, बंगलोर, C. IIM अहमदाबाद D. ISI, कोलकाता

    बरोबर उत्तर: ISI, कोलकाता

  • 8/24

    तबल्यातील सर्वात खोल, काही सेंटीमीटर व्यासाच्या भागाला काय म्हणतात?
    A. मध्य, B. मैदान, C. शाई, D. डफली

    बरोबर उत्तर: शाई

  • 9/24

    यापैकी कोणते शहर आणि नदीची जोडी चुकली आहे?
    A. दिल्ली- यमुना, B. लखनौ- गोमती, C. नागपूर- गोदावरी, D. तिरुचिरापल्ली- कावेरी

    बरोबर उत्तर- नागपूर- गोदावरी

  • 10/24

    जॅक मा हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत, ज्यांचे नाव अरेबियन नाईट्समधील पात्रावरून घेतले आहे?
    A. सिंदबाद, B. चमेली, C. अलीबाबा, D. अलादीन

    बरोबर उत्तर- अलीबाबा

  • 11/24

    २०२२ मध्ये कोणत्या टेनिसपटूने त्याचे विक्रमी चौदावे फ्रेंच ओपन जेतेपद जिंकले?
    A. नोव्हाक जोकोविच, B. रॉजर फेडरर, C. अँडी मरे, D. राफेल नदाल
     
    बरोबर उत्तर- राफेल नदाल

  • 12/24

    यापैकी कोणत्या गायकचं जन्माचं नाव वेगळं आहे?
    A. मोहम्मद रफी, B. कुमार सानू, C. महेंद्र कपूर, D. सोनू निगम
     
    बरोबर उत्तर: कुमार सानू

  • 13/24

    यापैकी कोणत्या संरचनेचा संबंध पत्त्याच्या खेळाशी आहे?
    A. बोगदा, B. स्टेडियम, C. फ्लायओव्हर, D. ब्रिज
     
    बरोबर उत्तर: ब्रिज

  • 14/24

    ‘जय जिनेंद्र’ हे अभिवादन सामान्यतः कोणत्या धर्माचे लोक वापरतात?
    A. जैन धर्म, B. हिंदू धर्म, C. बौद्ध धर्म, D. पारशी धर्म
     
    बरोबर उत्तर: जैन धर्म

  • 15/24

    दूध गरम करून त्यातील जंतू मारण्याची प्रक्रिया खालीलपैकी कोणती आहे?
    A. गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती, B. बाष्पीभवन, C. पाश्चरायझेशन, D. क्रिस्टलायझेशन
     
    बरोबर उत्तर- पाश्चरायझेशन

  • 16/24

    रामायणातील राजा दशरथाच्या पत्नींपैकी एक कैकेयी यापैकी कोणत्या राज्यातून आली होती?
    A. कौशल्या, B. काशी, C. कैकयी, डी. सुरसेन
     
    बरोबर उत्तर- कैकय

  • 17/24

    कोणत्या संस्थेने आपल्या परिसरात मुलांची तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ सुरू केले?
    A. भारतीय रेल्वे, B. तटरक्षक दल, C. दिल्ली विमानतळ,  D. सीमा सुरक्षा दल
     
    बरोबर उत्तर- भारतीय रेल्वे

  • 18/24

    २०१७ मध्ये, इरुला, तमिळनाडू, फ्लोरिडा, यूएस येथे एका जमातीचे सदस्य कोणत्या कामात मदतीसाठी गेले होते?
    A. US सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी, B. मधमाश्यांच्या पोळ्यातून मध काढण्यासाठी, C. गढूळ नद्यांना नेव्हिगेट करण्यासाठी, D. साप पकडण्यासाठी
     
    बरोबर उत्तर: साप पकडण्यासाठी

  • 19/24

    सरोजिनी नायडू उल्लेख केलेल्या कोणत्या पक्ष्याचं नाव काश्मिरी कवी हब्बा खातून यांच्यासाठी वापरलं जातं?
    A. कोकिळा, B. बुलबुल, C. मैना, D. चिमणी
     
    बरोबर उत्तर- कोकिळा

  • 20/24

    सापेक्षतेच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध असलेला हा शास्त्रज्ञ कोण आहे?
    A. आयझॅक न्यूटन, B. रॉबर्ट बॉयल, C. अल्बर्ट आइन्स्टाईन, डी. बेंजामिन फ्रँकलिन
     
    बरोबर उत्तर- अल्बर्ट आइन्स्टाईन

  • 21/24

    FIFA विश्वचषक २०२२ च्या संदर्भात, अल रिहला म्हणजे काय?
    A.   बोधवाक्य, B. ऑफिशियल फुटबॉल, C. कतार संघाचे टोपणनाव, D.  खेळाडूंचं गाव
     
    बरोबर उत्तर: ऑफिशियल फुटबॉल

  • 22/24

    कोणत्या पर्वतावर एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदाच 8 हजार मीटरवरील उंच शिखरावर चढाई केली होती?
    A.     अन्नपूर्णा, B. ल्होत्से, C. कांचनजंगा D. मकालू

    बरोबर उत्तर – अन्नपूर्णा

  • 23/24

    खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?
    A.   सुंदर कांड, B. वनवास कांड, C. युद्ध कांड D. किष्किन्धा कांड 

    बरोबर उत्तर – वनवास कांड 

  • 24/24

    यापैकी कोणते भारतरत्न विजेते भारताबाहेर दुसऱ्या देशात जन्मले आणि मरण पावले?
    A.   लाल बहादूर शास्त्री, B. मौलाना अबुल कलाम आझाद, C. मदर तेरेसा D. जेआरडी टाटा

    बरोबर उत्तर – जेआरडी टाटा
    (सर्व फोटो- संग्रहित)
     

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Kon banega crorepati 14 questions list amitabh bachchan hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.