-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे अमोल नाईक.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि सर्वांच्या परिचयाचा चेहरा बनला.
-
या मालिकेत त्याने राणाचा मित्र ‘बरकत’ची भूमिका साकारली होती.
-
सतत नवीन काहीतरी करण्याच्या तो मागे असतो.
-
तो लहान असताना त्यांच्या मंडळाच्या जिवंत देखाव्यात भाग घेत असे, तिथेच माझ्या अभिनयाच्या कलेची सुरुवात झाली.
-
नुकतेच गणेशोत्सवाचं निमित्त साधून त्याने एक खास फोटोशूट केले आहे.
-
यात तो लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत दिसत आहे.
-
या फोटोशूटच्या माध्यमातून समाजप्रभोधन घडून लोकांना काहीतरी संदेश देण्याच्या दृष्टीने त्याने हे फोटोशूट केले.
-
या फोटोशूटमध्ये त्याच्यासोबत मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर स्वरा शेट्येही सहभागी झाली आहे.
-
लोकमान्य टिळकांमुळे आपण गणपती एका उत्सवासारखा साजरा करू लागलो. या फोटोंमधून त्यांना वंदन करण्यात आले आहे.
-
त्यांच्या या वेगळ्या संकल्पनेला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेता अमोल नाईकचे गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट, लोकमान्य टिळकांना केले वंदन
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनला.
Web Title: Actor amol naiks special photo shoot on the occasion of ganeshotsav pays homage to lokmanya tilak rnv