• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raju srivastavas life changed when he went to return the money he received after mimicrying amitabh bachchan yps

Photos : राजू श्रीवास्तव यांनी ‘बच्चनगिरी’ करून केली होती पहिली कमाई; पण आयोजकाला पैसे परत करण्यासाठी गेले अन्…

अमिताभ यांची मिमिक्री केल्यानंतरच्या एका घटनेमुळे राजू श्रीवास्तव यांचे आयुष्य बदलले.

September 21, 2022 17:51 IST
Follow Us
  • आपल्या विनोदांनी लोकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. राजू यांच्या आयुष्यामध्ये अमिताभ बच्चन याचे खूप महत्त्व होते. अमिताभ यांची मिमिक्री केल्यानंतरच्या एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य बदलले.
    1/12

    आपल्या विनोदांनी लोकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. राजू यांच्या आयुष्यामध्ये अमिताभ बच्चन याचे खूप महत्त्व होते. अमिताभ यांची मिमिक्री केल्यानंतरच्या एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य बदलले.

  • 2/12

    राजू श्रीवास्तव मुळचे कानपूरचे होते. मुंबईला येण्यापूर्वी कानपूरमध्ये असताना ते अनेक कार्यक्रमांमध्ये मिमिक्री करायचे.

  • 3/12

    कानपूर शहरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये राजू अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करायचे. या कार्यक्रमांसाठी पैसे घेऊयात असा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही.

  • 4/12

    अशाच एका कार्यक्रमामध्ये मिमिक्री करायला ते गेले होते. सादरीकरण झाल्यानंतर आयोजकांनी त्यांना ५० रुपये देऊ केले.

  • 5/12

    येण्या-जाण्याच्या खर्चासाठी असल्याचे आयोजकांनी पैसे दिले आहेत असे त्यांना वाटले. तेव्हा ते स्वखर्चाने त्या आयोजकाच्या घरी पोहोचले आणि दिलेले पैसे परत घेण्यासाठी आग्रह केला.

  • 6/12

    मी तुम्ही दिलेले ५० रुपये परत करायला आलो आहे असे त्यांनी त्या आयोजकाला सांगितले. तेव्हा मी तुला तुझ्या सादरीकरणासाठी पैसे दिले होते, असे त्याने स्पष्ट केले.

  • 7/12

    त्यादिवशी लोकांना हसवूनसुद्धा पैसे कमावता येतात ही गोष्ट राजू यांना कळली. या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

  • 8/12

    काही दिवसांनी राजू श्रीवास्तव यांनी कानपूर सोडून मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी खूप नाव कमावले.

  • 9/12

    राजू श्रीवास्तव यांनी राजकारणामध्येही प्रवेश केला होता. ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. त्याआधी ते समाजवादी पार्टीमध्ये होते.

  • 10/12

    “द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेज” या कार्यक्रमामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती.

  • 11/12

    त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वामध्ये न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

  • 12/12

    पंतप्रधान मोदींसह मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फोटो सौजन्य – राजू श्रीवास्तव फेसबुक

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsराजू श्रीवास्तवRaju Srivastavरिअ‍ॅलिटी शोReality Show

Web Title: Raju srivastavas life changed when he went to return the money he received after mimicrying amitabh bachchan yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.