-
दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला ओळखले जाते. तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
सध्या ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ३० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या ही तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
-
ऐश्वर्याच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’तिची मुलगी आराध्याने एक खास रोल केला आहे. ऐश्वर्याने तिच्या मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला.
-
न्यूज १८ शी बोलताना ऐश्वर्या म्हणाली, “मी जेव्हा माझ्या भूमिकेबद्दल आराध्याला सांगितले तेव्हा ती फारच खूश झाली. तिला पीरियड ड्रामा पाहायला आवडतो.”
-
“तिला सेटवर येण्याचीही संधी मिळाली. तिथे मला पाहून तिला खूप आनंद झाला. सेटवर आल्यानंतर तिच्या डोळ्यात तो आनंद स्पष्ट दिसत होता.”
-
“आराध्याला मणिरत्नम यांच्याबद्दल फार आदर आहे. ते तिला फार आवडतात. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जेव्हा आराध्याला सेटवर येण्याची संधी मिळाली तेव्हा तिला फार आनंद झाला.”
-
“इतकंच नव्हे तर त्यावेळी मणिरत्नम यांनी तिला एका सीनच्या सुरुवातीला अॅक्शन म्हणण्याची संधीही दिली. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.”
-
“ती आनंदाच्या भरात फार वेडी झाली होती. ती मला येऊन म्हणाली मला सरांनी अॅक्शन बोलण्याची संधी दिली आहे. सुरुवातीला तिला याबाबत आश्चर्य वाटले आणि आम्हीही हे ऐकून फार थक्क झालो.”
-
“त्यावेळी आम्ही तिला सांगितलं की आजपर्यंत आम्हाला कोणीही अशी संधी दिलेली नाही. मणिरत्नम सरांनी आराध्याला दिलेली संधी तिच्यासाठी अमूल्य आहे.”
-
“मला खात्री आहे की ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण आठवण असेल”, असे ऐश्वर्याने म्हटले.
-
मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला पोन्नियन सेल्वन १ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन ही दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनी ही भूमिका साकारत आहे. ती पझुवूरची राजकुमारी आहे.
-
तसेच ती मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम आदित्य करिकलनच्या भूमिकेत आहे.
‘पोन्नियन सेल्वन’शी ऐश्वर्याच्या लेकीचं खास कनेक्शन, मणिरत्नम यांनी आराध्यावर सोपवली होती ‘ही’ जबाबदारी
या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या ही तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
Web Title: Mani ratnam once gave aishwarya rai daughter aaradhya an opportunity on ponniyin selvan nrp