Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali shared london photos instagram post seeking attention kak

Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”

प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

September 29, 2022 09:10 IST
Follow Us
  • prajakta mali london photos instagram post viral
    1/18

    लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालते. प्राजक्ताचा चाहता वर्गही मोठा आहे.

  • 2/18

    आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. अल्पावधीतच कलाविश्वात प्राजक्ताने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 3/18

    ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तिने मालिकांप्रमाणेच चित्रपटांतही काम केलं आहे.

  • 4/18

    काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता चित्रपटाच्या शूटिंग निमित्ताने लंडनला गेली आहे. पण तिथे तिला करमत नसल्याचं तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 5/18

    प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 6/18

    “ने मजसी ने परत मातृभीला. सागरा प्राण तळमळला. भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं ठरेल. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो”.

  • 7/18

    “एक क्षणदेखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही. त्याला अनेक कारणं आहेत”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 8/18

    पुढे ती म्हणते, “ह्याच ब्रिटिशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं? कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच. राणी गेल्यानं देश दुखवट्यात आहे, ती मरगळ जाणवली”.

  • 9/18

    पोस्टमधे प्राजक्ताने लंडनमधील जीवनशैली आणि तेथील संस्कृतीवर भाष्यही केलं आहे.

  • 10/18

    ती म्हणते, “इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, तर जखडून गेल्यासारखं झालं. कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं. संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत”.

  • 11/18

    “इथे राहत असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली. (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)”, असंही पुढे प्राजक्ताने म्हटलं आहे.

  • 12/18

    पोस्टमध्ये प्राजक्ताने काम संपल्यावर लगेचच भारतात परतणार असल्याचंही सांगितलं आहे.

  • 13/18

    ती म्हणते , “कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती. असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे”.

  • 14/18

    “देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले. फक्त २ दिवस बाकी. आलेच..”, असं म्हणत तिने देवाचे आभारही मानले आहेत.

  • 15/18

    प्राजक्तासह अभिनेता वैभव तत्ववेदी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडेदेखील लंडनला गेले आहेत.

  • 16/18

    प्राजक्ताने लंडनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

  • 17/18

    (सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का?, रिंकू नाही तर…)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta Maliमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali shared london photos instagram post seeking attention kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.