-
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अटीवर काम करणारा एकमेव अभिनेता म्हणजे राज कुमार. आज त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसे आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेले संवाद बघूयात.
-
सौदागार चित्रपटातील राज कुमार यांचा चांगलाच गाजलेला संवाद म्हणजे, “जानी.. हम तुम्हें मारेंगे, और ज़रूर मारेंगे.. लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक़्त भी हमारा होगा.”
-
याच चित्रपटातील त्यांचा हा संवादही प्रचंड गाजला तो म्हणजे, “शेर को सांप और बिच्छू काटा नहीं करते.. दूर ही दूर से रेंगते हुए निकल जाते हैं.”
-
‘बेताज बादशाह’ चित्रपटामधला हा संवाद राज कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेसा आहे तो म्हणजे, “हम अपने कदमों की आहट से हवा का रुख़ बदल देते हैं.”
-
‘तिरंगा’ चित्रपटातील ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग या पात्राचा हा संवाद आणि राजकुमार यांची संवाद फेक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तो संवाद म्हणजे, “अपना तो उसूल है. पहले मुलाकात, फिर बात, और फिर अगर जरूरत पड़े तो लात.”
-
‘वक्त’ या गाजलेल्या चित्रपटातील हा संवादही प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला तो म्हणजे, “राजा के ग़म को किराए के रोने वालों की ज़रूरत नहीं पड़ेगी चिनॉय साहब!”
-
‘सौदागर’ चित्रपटात राज कुमार आणि दिलीप कुमार यांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यापैकीच हा लोकप्रिय संवाद म्हणजे, “जब राजेश्वर दोस्ती निभाता है तो अफसाने लिक्खे जाते हैं.. और जब दुश्मनी करता है तो तारीख़ बन जाती है.”
-
‘मरते दम तक’ चित्रपटातील या संवादाप्रमाणे राज कुमार चित्रपटसृष्टीत वावरायचे, तो संवाद म्हणजे, “दादा तो दुनिया में सिर्फ दो हैं. एक ऊपर वाला और दूसरे हम.”
-
अशा अनेक अजरामर संवांदांमुळे आणि राज कुमार यांच्या खास शैलीतील अभिनयामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. (फोटो सौजन्य : फेसबुक राज कुमार आणि इंडियन एक्सप्रेस)
Photos : “जानी हम तुम्हें मारेंगे, और जरूर मारेंगे..”; बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या राज कुमार यांचे अजरामर संवाद
केवळ स्वतःच्या अटींवर काम करणाऱ्या राज कुमार यांचे हे अजरामर संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
Web Title: Bollywood actor raaj kumar and his populor dialogues from superhit movies avn