-
बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान काही ना काही कारणाने चर्चेत असते.
-
करीना आणि सैफ अली खान यांच्या मुंबईतील घराचेही त्यांच्या पतौडी पॅलेस इतकेच चाहत्यांना आकर्षण आहे.
-
करीना बांद्रा येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.
-
तिच्या या अपार्टमेंटचे नाव फॉरच्युन हाईट्स असे असून इथे तिचे तीन बीएचकेचे घर आहे.
-
या घराची किंमत १२ ते १५ करोड असल्याचे बोलले जाते.
-
करीना अनेकदा तिच्या मुंबईच्या घराची झलक चाहत्यांना फोटोंमधून दाखवत असते.
-
या घरातील स्वयंपाकघर बेबोने युरोपीयन स्टाईलचे करून घेतले आहे.
-
तिच्या घरी मित्रमंडळी, नातेवाईक यांचा सतत राबता असतो. त्यामुळे गेट-टूगेदर करण्यासाठी त्यांच्या घरी मोठे डायनिंग टेबलही आहे.
-
सैफ अली खानला वाचनाची आवड असल्याने या घरात प्रचंड मोठी लायब्ररीही आहे.
-
वाचनाबरोबरच अनेकदा करीना लायब्ररीमधले फोटोही शेअर करते.
-
त्यासोबतच घराचे सगळे फर्निचर हे सागवानी लाकडापासून बनवलेले आहे.
-
या घराला मोठी बाल्कनीदेखील आहे, बेबो इथे वर्कआउट आणि योगा करते हे तिने अनेकदा सांगितले आहे.
हटके फर्निचर ते प्रशस्त बेडरूम…’असे’ आहे करीना कपूरचे मुंबईतील घर, पहा Inside photos
करीना बांद्रा येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.
Web Title: Photos of kareena kapoor mumbai luxurious house rnv