-
माधुरी दीक्षितचा नवा कोरा OTT चित्रपट मजा मा नुकताच रिलीज झाला आहे. अमेझॉन प्राईमवर हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे कारण म्हणजे माधुरीने यात अत्यंत वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे.
-
यापूर्वी माधुरीने नेटफ्लिक्स (Netflix) वरील वेब सिरीज द फेम गेम मधून OTT वर पदार्पण केले होते. मजा मा मध्ये पन्नाशी गाठलेल्या महिला एकमेकींसमोर आपण समलैंगिक असल्याची कबुली देतात. माधुरी सुद्धा यामध्ये महिलांकडे आकर्षित होते.
-
यापूर्वी केवळ माधुरीच नव्हे तर मराठमोळ्या प्रिया बापट सह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीं लेस्बियन म्हणजेच समलैंगिक भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत.
-
शबाना आझमी व नंदिता दास यांनी दीपा मेहता यांचा चित्रपट फायर मध्ये समलैंगिक भूमिका सादर केली होती.
-
अन्वेशी जैनने एकता कपूरच्या गंदी बातमध्ये समलैंगिक महिलेची भूमिका साकारली होती.
-
शेफाली शाह: यंदा रिलीज झालेली वेबसिरीज ह्यूमन्स मध्ये शेफाली शाह हिने लेस्बियन डॉक्टरांची भूमिका साकारली होती.
-
हॉटस्टारच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटने लेस्बियनची भूमिका साकारली होती.
-
सोनम कपूर हिने सुद्धा एक लड़की को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात समलैंगिक भूमिका साकारली आहे. यात तिच्या वडिलांचे पात्र अनिल कपूर यांनीच साकारले होते.
-
भूमी पेडणेकर: बधाई दो चित्रपटात भूमी पेडणेकर हिने समलैंगिक भूमिका साकारली होती. फिल्म जरी बॉक्स ऑफिसवर फार गाजली नसली तरी भूमीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
-
कीर्ती कुल्हारीने अलीकडेच हॉटस्टारच्या ह्यूमन या वेबसिरीजमध्ये एका लेस्बियन महिलेची भूमिका साकारली आहे.
-
नेटफ्लिक्सच्या फोर मोअर शॉट्समध्ये बानी जे ने लेस्बियन भूमिका साकारली होती.
-
अजीब दास्तान सिरीज मध्ये कोंकणा सेन व आदिती राव हैदरी यांनी लेस्बियन पात्र साकारले होते.
-
प्रीती रैनाने ‘द नाईट इन द मुंबई’मध्ये लेस्बियनची भूमिका साकारली होती.
-
करिश्मा तन्न: अमेझॉन प्राईमवर सप्टेंबरमध्ये हश हश ही वेब सिरीज रिलीज झाली होती यात अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने समलैंगिक पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते.
-
‘द मॅरीड वुमन’मध्ये रिद्धी डोगराने लेस्बियनची भूमिका साकारली होती.
माधुरी दीक्षित Lesbian भूमिका साकारताना.. ; प्रिया बापट ते शेफाली शाह ‘या’ अभिनेत्रींनी दाखवले होते धाडस
Lesbian Role Played By Bollywood Actress :चला अशाच अभिनेत्री ज्यांनी लेस्बियन भूमिका साकारल्या त्यांच्या कामाची एक झलक पाहुयात..
Web Title: Lesbian role played by bollywood actress madhuri dikshit priya bapat shefali shah four more shots svs