-
मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ आणि निखळ हसणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते.
-
तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
-
प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली.
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता ही आगामी चित्रपटाच्या शूटींगनिमित्त लंडनला गेली होती.
-
तिथून परतल्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या कामात व्यस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
मात्र या दरम्यान तिने चमचमीत आणि मराठमोळ्या जेवणावर ताव मारला आहे.
-
याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना ती म्हणाली, “परतल्यावर भूकेचे (तिखट, चमचमीत जेवणाचे) डोहाळे लागलेत…”
-
“मी सध्या हे खातेय.. (तरी भूकेच्या भरात सगळीकडे फोटोज् नाही काढले…)”
-
“Diet गेलं तेल लावत…”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले.
-
यात ती एका हॉटेलमध्ये बसून छान हे पदार्थ खाताना दिसत आहे.
-
तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “किती पन खाल्लं तरी आमची प्राजू पतली”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
-
“प्राजू प्लीज जड जेवण खाऊ नकोस ठीक आहे तुझं वजन वाढेल आणि तू जाड दिसशील आणि सौंदर्य आणि ग्लॅमरस लूक निघून जाईल काळजी घे मला तुला स्लिम आणि सुंदर बघायचं आहे कारण तू खूप सुंदर दिसत आहेस”, असा सल्ला तिला तिच्या एका चाहत्याने दिला आहे.
-
“तुम्ही सांगितल म्हणून आम्ही हेल्दी फूड आणि योगा सुरू केला आणि तुम्हीच आता चमचमीत पदार्थ खातय. आम्हाला ही आता एखादा चीट डे मिल घ्यावा लागेल…”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
प्राजक्ता माळीला लागलेत डोहाळे, फोटो शेअर करत म्हणाली “चमचमीत अन्…”
“डोहाळे लागलेत…” अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
Web Title: Marathi actress prajakta mali enjoying maharashtrian food instagram post viral nrp