-
अक्षय कुमार:
‘सौगंध’ चित्रपटातून अक्षयने प्रमुख भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यातील भूमिकेसाठी त्याला ५१ हजार रुपये मिळाले होते. -
दीपिका पदुकोण:
दीपिका ही आताच्या घडीला सर्वात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री आहे. ‘ओम शांती ओम’ हा दीपिकाचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटात काम करण्यासाठी तिने एकही रुपया मानधन आकारले नाही. -
शाहरुख खान:
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘दीवाना’मधून शाहरुखने अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. शाहरुखला त्याच्या पहिल्याच सिनेमासाठी ४ लाख रुपये मिळाले होते. -
आमिर खान:
‘कयामत से कयामत तक’मधून आमिरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला ११ हजार रुपये मिळाले होते. -
अमिताभ बच्चन:
१९६९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटासाठी त्यांना ५००० रुपये मिळाले होते. -
सलमान खान:
‘मैंने प्यार किया’ हा सलमान खानचा पहिला बॉलिवूड चित्रपट. यासाठी त्याला ७५ हजार रुपये मिळाले होते. -
शाहिद कपूर:
‘इश्क विश्क’ या चित्रपटातून शाहिद कपूरने २००३ मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याने १ लाख ५० हजार रुपये फी मिळाली होती. -
आलिया भट्ट:
आलियाने ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. -
या चित्रपटासाठी तिला १५ लाख रुपये मिळाले असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आज कोटींच्या घरात फी आकारणाऱ्या बॉलिवूड स्टार्सना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन
बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात काम करणारे सुपरस्टार्स आकारत असलेली रक्कम ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचवतात. परंतु याच कलाकारांना पहिल्या चित्रपटासाठी मिलेलेली फी जाणून घेऊया.
Web Title: Current top earning bollywood stars got this much amount for their first film rnv