-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही मनसेच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला असून आकर्षक रोषणाई केली आहे.
-
यानिमित्ताने राजकीय नेतेमंडळींसह अनेक कलाकारही या ठिकाणी हजेरी लावताना दिसतात.
-
नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
-
याचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी राज ठाकरेंनी सिद्धार्थच्या जाधवच्या खांद्यांवर हात ठेवून फोटो काढला. या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
“मा.राज साहेबांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर साकारला गेलेला दिव्य अतिभव्य दीपोत्सव आणि या संकल्पनेच्या उदघाटनाला उपस्थित राहण्याचा मान हीच खरी या वर्षीची दिवाळी, खरा आनंद”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
-
राज साहेबांच्या सोबतच्या क्षणांची खूप गोड आठवण देणारी दिवाळी, असेही त्याने हा फोटो शेअर करताना म्हटले.
-
“दादरला शिवतीर्थावर नक्की भेट द्या. या अनमोल क्षणांचे सोबती व्हा.. शुभ दीपावली”, असे आवाहनही त्याने त्याच्या चाहत्यांना केले आहे.
-
तसेच शिवतीर्थावर साकारला गेलेला भव्य दीपोत्सव पाहण्यासाठी अभिनेते महेश मांजरेकर, निर्माते अभिजीत पानसे, सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्रीसह यांसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. याचे काही फोटोही तिने शेअर केले होते.
-
यावेळी तिच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ या कलाकारांबरोबच विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळी हे महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकारही उपस्थित होते.
आधी मजेशीर गप्पा, नंतर खांद्यावर हात ठेवत फोटोसाठी पोज; राज ठाकरे-सिद्धार्थ जाधवच्या फोटोने वेधले लक्ष
“राज साहेबांच्या सोबतच्या क्षणांची खूप गोड आठवण देणारी दिवाळी”, असेही त्याने हा फोटो शेअर करताना म्हटले.
Web Title: Siddharth jadhav and many marathi celebrities visit raj thackeray mns diwali 2022 nrp