-
यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास ठरली. कारण २५ ऑक्टोबरला (मंगळवारी) दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला.
-
‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना हिंदी चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
-
अक्षयच्या ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली.
-
मात्र आता या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
-
‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
-
‘राम सेतु’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ११ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी २० लाख रुपये कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३४ कोटी २० लाख रुपये इतपत कमाई केली आहे.
-
तर ‘थँक गॉड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवशी १४ कोटी १० लाख रुपये कमाई केली.
-
पण तिसऱ्या दिवशी ‘थँक गॉड’चा आकडा पूर्णपणे घसरला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने फक्त ४ कोटी १४ लाख इतपत कमाई केली.
-
पण ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं या चित्रपटामधील अभिनेता शरद केळकरने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं.
-
‘हर हर महादेव’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल २ कोटी २५ लाख रुपये इतपत कमाई केली. (सर्व फोटो – फाइल फोटो, फेसबुक)
अक्षय कुमार, अजय देवगणचे बिग बजेट चित्रपट सुपरफ्लॉप अन् ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांची पसंती, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ चित्रपट एकत्रित प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळत आहे हे आपण पाहणार आहोत.
Web Title: Ram setu thank god har har mahaedv movie release on same date in diwali know about films box office collection kmd