-
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत.
-
सोशल मीडियावर दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगत आहेत.सानिया मिर्झाने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या, ज्यानंतर या चर्चांना उधाण आलं.
-
तर काही दिवसांपूर्वी सानियाने मुलगा इझानचा वाढदिवस शोएबसोबत साजरा केला होता. पण शोएबने वाढदिवसाचे फोटो शेअर केले पण सानियाने ते केले नाहीत, म्हणूनही त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे बोलले जाऊ लागले.
-
पण घटस्फोटांच्या अफवांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या.
-
काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघे घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
या दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाल्याने ते वेगळे होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काही दिवसांतच या अफवा असल्याचे समोर आले.
-
देसी गर्ल प्रियांका चोप्राबद्दलही अशी अफवा काही महिन्यांपूर्वी पसरली होती की ती निक जोनसपासून घटस्फोट घेत आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते.
-
मध्यंतरी शाहिद कपूर एका मुलाखतीत गंमतीत म्हणाला की मीरा त्याला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याचे हे बोलणे वाऱ्यासारखे पसरले आणि ते दोघे विभक्त होणार असल्याच्या अफवा रंगल्या होत्या.
-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या होत्या. याबद्दल ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला अभिषेकने सडेतोड उत्तर देत अफवांना पूर्णवीराम दिला होता.
Photos: फक्त सानिया मिर्झाच नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कपल्सच्याही घटस्फोटांच्या रंगल्या होत्या चर्चा
घटस्फोटांच्या अफवांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
Web Title: These famous bollywood couples faced rumours of their divorce rnv