-
अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं.
-
आपल्या भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणारी सईने ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ चित्रपटात बिकिनी परिधान केली होती.
-
तिच्या या लूकमुळे सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली.
-
काहींनी सईचा बिकिनी लूक पाहून तिला ट्रोल केलं तर काहींना कौतुक केलं.
-
नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने मराठी चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान करण्याबाबत भाष्य केलं.
-
ती म्हणाली, “मराठी चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान करणारी मी पहिली अभिनेत्री आहे हे मलाही माहित नव्हतं. असा विचारही मी कधी केला नाही. जी गोष्ट मला आवडते ती मी करते. भूमिकेची गरज होती म्हणून मी बिकिनी परिधान केली.”
-
“एक मुलगी जर समुद्रामधून बाहेर येत असेल तर ती ट्रॅक सूट परिधान करून थोडी बाहेर येणार. ती बिकिनीच घालणार. हे माझ्यासाठी इतकं सोपं होतं.”
-
“पण यामुळे माझ्यावर बिकिनी परिधान केल्याचा एक टॅग लागला. आता मला इतकं काम करायचं आहे की लोक हा टॅग विसरून जातील.”
-
“जेव्हा मी बिकिनी परिधान करून चित्रपटात काम केलं तेव्हा प्रेक्षक, प्रसारमाध्यमांचा मिळालेला प्रतिसाद पाहून मी आश्चर्यचकित झाले.”
-
“बऱ्याच लोकांनी माझ्या या नव्या लूकला पाठिंबा दिला. मला या लूकमध्येही सगळ्यांनी स्वीकारलं. जेव्हा चित्रपटासाठी बिकिनी परिधान केली तेव्हा एवढी चर्चा होईल असा मी विचारही केला नाही.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)
मराठी चित्रपटामध्ये बिकिनी परिधान करण्याबाबत सई ताम्हणकरचं मत काय? म्हणाली, “भूमिकेची गरज…”
मराठी चित्रपटांमध्ये बिकिनी परिधान करण्याबाबत सई ताम्हणकरने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
Web Title: Marathi actress talk about wear bikini in marathi cinema says that role requirement see details kmd