-
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले.
-
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
-
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
-
गेली सात दशकं त्यांनी त्यांच्या कामातून प्रेक्षकांना भुरळ घातली.
-
फक्त मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
-
त्यांचे पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
-
त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
-
बालगंधर्व रंगमंदिर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,जिल्हाधिकारी राजेश देशमुख, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर, अभिनेते राहुल सोलापूरकर,अभिनेत्री पूजा पवार, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, किशोर कदम, मेघराज राजे भोसले या कलाकारांसह नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं.
-
त्याचबरोबर त्यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्या शिष्यांनीही त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.
-
विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना कुटुंबिय भावूक झाले होते.
-
त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे.
-
विविध माध्यमांतून त्यांचे चाहते आणि सहकलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
सर्व फोटो सौजन्य: सागर कासार (इंडियन एक्सप्रेस ग्रुप)
Photos: विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा, अंतिम दर्शनावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले.
Web Title: Veteran actor vikram gokhale passes away after suffering from multiple organ failure rnv