-
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो.
-
कामाबरोबरच त्याचं नाव अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिलं.
-
कार्तिक आर्यनचं नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.
-
सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी त्याचं अफेअर बरंच गाजलं होतं. पण नंतर दोघंही वेगळे झाले.
-
त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या प्लॅन बद्दल खुलासा केला आहे.
-
सध्या ‘फ्रेडी’ चित्रपटामुळे चर्चेत असलेला कार्तिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशा चर्चा होत्या.
-
या सगळ्याच चर्चांना कार्तिक आर्यनने आता पूर्णविराम दिला आहे.
-
कार्तिकला या मुलाखतीत, लग्नाबाबत तुझे भविष्यात काय प्लॅन आहेत? तू कधी आणि कोणाशी लग्न करणार आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावर तो म्हणाला, “सध्या माझ्यावर लग्नचं कोणतंही प्रेशर नाही. मी पुढची २-३ वर्षे तरी फक्त कामावर लक्ष केंद्रित करावं असं माझ्या आईला वाटतं.
-
“पण माझ्या आयुष्यात प्रेमासाठी खूप जागा आहे आणि मी वाट पाहतोय की कधी प्रेमात पडेन.” असंही तो म्हणाला.
-
दरम्यान कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याच्या नवा चित्रपट ‘फ्रेडी’ अलिकडेच प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री अलाया एफ मुख्य भूमिकेत आहे.
-
डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनी बरंच कौतुक केलं आहे.
-
आगामी काळातही त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
-
(फोटो सौजन्य- कार्तिक आर्यन इन्स्टाग्राम)
कार्तिक आर्यन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? अभिनेता म्हणाला, “माझ्या आईने…”
कार्तिक आर्यनला एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्याने यावर भन्नाट उत्तर दिलं आहे
Web Title: Kartik aryan reaction on marriage says i have space in my life for love mrj