-
करोना काळानंतर आलेला आमिरचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट चांगलाच वादाचा मुद्दा ठरला.
-
‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणून या चित्रपटाकडे पहिले गेले होते. सोशल मीडियावर या बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आणि लोक हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गेलेच नाहीत. परिणामी चित्रपट फ्लॉप ठरला.
-
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
चित्रपटाने जितकी कमाई केली तितकीच या चित्रपटावर टीका झाली आहे.
-
या चित्रपटात बॉलिवूडमधले तगडे कलाकार होतेच, या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले होते. नव्व्दच्या दशकात काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट होता.
-
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित होता राजपूत संघटना आणि करणी सेनेने चित्रपटाला विरोध केला होता.
-
अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट ‘राम सेतू’ प्रदर्शित होण्याआधीच त्यावरून बराच गदारोळ झाला होता. या चित्रपटात राम सेतूबाबत चुकीचे तथ्य दाखवले जात असल्याचे बोलले गेले होते.
-
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा चित्रपट ‘थँक गॉड’ देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हिंदू धर्माचा अपमान या चित्रपटात केला आहे अशी टीका करण्यात आली होती.
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली, मात्र या चित्रपटाला सोशल मीडियावर बहिष्काराला सामोरे जावे लागले होते.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
Photos : कोणी चुकीचा इतिहास दाखवला, तर कोणी धार्मिक भावना दुखावल्या; २०२२ मधील वादग्रस्त चित्रपटांची लिस्ट एकदा बघाच
एकूणच २०२२ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी वादग्रस्त ठरलं आहे
Web Title: Photos bollywood 2022s most controversial films who suffer from lot off criticism spg