-
‘पठाण’ चित्रपटाची झलक प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावरून सध्या अनेकांनी संपत व्यक्त केला आहे. या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसत आहे.
-
शाहरुख खान आणि दीपिकावर हे गाणे चित्रित झाले असून यामध्ये दीपिकाने एक केशरी रंगाची बिकनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ‘बेशरम रंग’, यामुळे हिंदू महासभेने यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे.
-
या गाण्याला भाजपने विरोध केला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी, या गाण्यात बदल केले नाहीत तर हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार नाही, असे म्हटले आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशात या चित्रपटाच्या निषेधार्थ पुतळेही जाळण्यात येत आहेत.
-
मात्र दीपिकाचा चित्रपट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि वाद यांचे जुने नाते आहे. दीपिकाचे असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजपूर्वीच वादात सापडलेले आहेत.
-
यापूर्वी दीपिकाचा ‘पद्मावत’ हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटात दीपिकाचे काही सीन्स चुकीच्या पद्धतीने दाखविल्याबद्दल निषेध करण्यात आला होता.
-
दीपिका आणि रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता.
-
दीपिका पदुकोणच्या ‘राम लीला’ चित्रपटाच्या नावावरूनही वाद झाला होता. यानंतर चित्रपटातील रोमँटिक अँगलबद्दल बरीच चर्चा झाली.
-
दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपटही चर्चेत आला होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका जेएनयूमध्ये पोहोचली होती, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.
-
दीपिकाचे चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यामध्ये तिच्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटात कोणताही वाद झाला नसला तरी दीपिकाने तिच्या नैराश्याचा खुलासा केल्याने हा चित्रपट चर्चेत आला होता. (Photos: Instagram)
Photos: दीपिका अन् वाद जसं काही ठरलेली गोष्ट! ‘पठाण’पूर्वी एक दोन नाही तर तब्बल इतके चित्रपट अडलेले वादाच्या भोवऱ्यात
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि वाद यांचे जुने नाते आहे. दीपिकाचे असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजपूर्वीच वादात सापडलेले आहेत.
Web Title: Shahrukh khan pathaan deepika padukone films movies was mired in controversy before its release bollywood pvp