• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from boycott trend to deepika padukone saffron bikini here are the 2022 biggest bollywood controversies avn

बॉयकॉट ट्रेंड, रणवीरचं न्यूड फोटोशूट ते दीपिकाची भगवी बिकिनी; २०२२ मध्ये या वादग्रस्त घटनांची होती सर्वात जास्त चर्चा

दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे

December 18, 2022 12:41 IST
Follow Us
  • bollywood controversy 1
    1/12

    बॉलिवूड आणि वाद हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. गेले काही दिवस बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद निर्माण होताना आपण बघत आहोत. आज आपण याच वर्षीच्या बॉलिवूडच्या कॉंट्रोवर्सीबद्दल जाणून घेऊयात.

  • 2/12

    काही महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलिवूड स्टार अजय देवगण याच्यात ट्विटरवर वाद रंगला. दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेत जास्त चालत असल्याने कोणती भाषा महत्त्वाची यावरून या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. नंतर या दोघांनी या वादावर पडदा टाकला होता.

  • 3/12

    अभिनेते आणि ते करत असलेल्या जाहिराती या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. ‘विमल इलायची’ची जाहिरात प्रथम अजय देवगण करायचा, नंतर शाहरुख खानने त्याची सोबत दिली. नुकतंच यावर्षी याच जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्याने कित्येक लोकांनी नाकं मुरडली.

  • 4/12

    अक्षय कुमारला या जाहिरातीवरून चांगलंच ट्रोल केलं गेलं. इतकंच नाही तर अक्षयला यासाठी जाहीरपणे सोशल मीडियावर चाहत्यांची माफीदेखील मागावी लागली आणि पुन्हा अशा जाहिरातीत तो दिसणार नाही असंही त्याने स्पष्ट केलं.

  • 5/12

    भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून चांगलाच वाद रंगला होता. या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे.

  • 6/12

    ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड यावर्षी सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होता. या ट्रेंडचा बॉलिवूड चित्रपटांना चांगलाच फटका बसला. आमिर खानपासून अक्षय कुमारपर्यंत मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट आपटले.

  • 7/12

    याविषयी अर्जुन कपूरने केलेलं एक वक्तव्य आणखी चर्चेत आलं आणि त्याच्या या वक्तव्यामुळे लोकांनी बॉलिवूडला आणखी जास्त बॉयकॉट करायला सुरुवात केली. “आमच्या मौन बाळगण्याचा चुकीचा अर्थ घेतला जातो आहे” अशी तक्रार अर्जुनने एका मुलाखतीमध्ये केली होती. त्यानंतर त्यालाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

  • 8/12

    चित्रविचित्र कपडे आणि एकदम भन्नाट स्वभाव यासाठी कायम चर्चेत असणाऱ्या रणवीर सिंगचं ‘न्यूड फोटोशूट’ चांगलंच गाजलं. यासाठी रणवीरला प्रचंड ट्रोल केलं गेलं. कित्येक ठिकाणी त्याच्यावर तक्रारही दाखल करण्यात आली. अजूनही या प्रकरणावर पडदा पडलेला नाही.

  • 9/12

    ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीजरही वादाच्या भोवऱ्यात अडकला. गंडलेले स्पेशल इफेक्ट आणि प्रभू श्रीराम आणि रावण यांचं अयोग्य चित्रण यामुळे याच्या टीजरला प्रचंड विरोध झाला. हा विरोध एवढा वाढला की निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

  • 10/12

    दिग्दर्शक साजिद खान याच्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात झालेल्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे साजिद खानचं खूप वर्षांपूर्वीचं ‘मीटू’ प्रकरण समोर आलं आणि सोशल मीडियावर त्याचा खूप विरोध झाला. कित्येक अभिनेत्रींनी साजिदने केलेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा करत तक्रारदेखील दाखल केली.

  • 11/12

    प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट या वर्षाअखेरीपर्यंत चर्चेत होता. गोव्याच्या चित्रपट महोत्सवात इस्रायली दिग्दर्शक आणि ज्युरीने या चित्रपटाला व्हल्गर आणि प्रोपगांडा म्हंटल्याने वातावरण चांगलंच गढूळ झालं. त्यानंतर ते दिग्दर्शक नदाव लॅपिड यांना याबद्दल माफीदेखील मागावी लागली.

  • 12/12

    नुकतंच शाहरुख खानच्या आगामी चित्रपट ‘पठाण’मधील गाण्यावरून सध्या वेगळाच वाद निर्माण झाला आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच गदारोळ माजला आहे. एवढंच नव्हे तर यामुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From boycott trend to deepika padukone saffron bikini here are the 2022 biggest bollywood controversies avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.