• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taali sam bahadur swatantra veer savarkar chakda express 12 biopic will be released in 2023 hrc

Photos: २०२३मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल १२ बायोपिक येणार; सुश्मिता सेन ते विकी कौशल साकारणार दिग्गजांच्या भूमिका

२०२३ मध्ये आपल्याला अनेक दिग्गजांच्या बायोपिक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. यामध्ये भारताचे २ दिवगंत पंतप्रधान, लष्करातील अधिकारी, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा समावेश आहे. येत्या वर्षात आपल्याला कोणते बायोपिक पाहायला मिळतील, यावर एक नजर टाकुयात…

Updated: December 21, 2022 20:27 IST
Follow Us
  • Biopic in 2023
    1/12

    २०२३मध्ये सुश्मिता सेन ‘ताली’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.

  • 2/12

    भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘छकडा एक्सप्रेस’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • 3/12

    फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहाद्दूर’मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 4/12

    ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या जीवनावर आधारित ‘पिप्पा’मध्ये इशान खट्टर मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • 5/12

    ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्व्हे’ चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

  • 6/12

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • 7/12

    परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित ‘इक्किस’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • 8/12

    ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना रणौत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 9/12

    क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे, पण यामध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसेल, याबाबत निर्मात्यांनी माहिती दिलेली नाही.

  • 10/12

    इंजिनिअर सरदार जसवंत गिल यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे.

  • 11/12

    दिवगंत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘अटल’ चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसतील.

  • 12/12

    कोरेगाव भीमावर आधारित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सिद्धांक इनामदार यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन रामपाल दिसणार आहे. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarअनुष्का शर्माAnushka Sharmaविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Taali sam bahadur swatantra veer savarkar chakda express 12 biopic will be released in 2023 hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.