• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. many famous bollywood actresses will make their ott debut next year rnv

चित्रपटांनंतर आता वाटचाल वेब सीरिजकडे…’या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पुढील वर्षी करणार ओटीटीवर पदार्पण

गेल्या काही वर्षात वेब सिरिज हे माध्यम तूफान लोकप्रिय झालं आहे. आतापर्यंत अनेक आघाडीच्या बॉलिवूड स्टार्सनी या माध्यमात त्यांचं नशीब आजमावलं आहे. तर काही अभिनेत्री पुढील वर्षी या माध्यमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Updated: December 24, 2022 12:16 IST
Follow Us
  • गेले अनेक महिने सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन'ची सर्वत्र चर्चा आहे. या वेब सीरिजमधून ती वेब सीरिज विश्वात पदार्पण करणार आहे. करण जोहर निर्मित या सिरिजमध्ये सारा स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
    1/9

    गेले अनेक महिने सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ची सर्वत्र चर्चा आहे. या वेब सीरिजमधून ती वेब सीरिज विश्वात पदार्पण करणार आहे. करण जोहर निर्मित या सिरिजमध्ये सारा स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 2/9

    कन्नन अय्यर या सीरिजचं दिग्दर्शन करणार असून ही मालिका १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे.

  • 3/9

    करीना कपूर ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मधून वेब सीरिज माध्यमात पदार्पण करणार आहे. ही सिरिज जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित आहे. 

  • 4/9

    या सीरिजमध्ये करीना कपूर बरोबरच विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजचं दिग्दर्शन सुजय घोष करत आहेत.

  • 5/9

    २०२३ मध्ये काजोल ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’च्या ‘द गुड वाईफ : प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर माध्यमात पदार्पण करणार आहे. यातील तिचा फर्स्ट लूक आणि टीझरही मध्यंतरी आऊट झाला होता.

  • 6/9

    या वेब सीरिजमध्ये ती आपल्याला एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये काजोलशिवाय कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, आमिर अली दिसणार आहेत. तर सुपर्ण वर्मा या सीरिजचं दिग्दर्शन करत आहे.

  • 7/9

    उर्मिला मातोंडकर ‘तिवारी’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही एक थ्रिलर सिरिज आहे.

  • 8/9

    या सीरिजची कथा एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या सीरिजचं दिग्दर्शन सौरभ वर्मा करत आहेत

  • 9/9

    अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘दहाड’ या वेब सीरिजमधून पुढच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन रीमा कागती करत आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Many famous bollywood actresses will make their ott debut next year rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.