-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपेकी एक असलेला प्रसाद जवादेचा प्रवास रविवारी संपला.
-
प्रसादने घरातून एक्झिट घेताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रसाद हा ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होता.
-
घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसादने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील त्याच्या प्रवासाचा उलगडा केला आहे.
-
‘बिग बॉस’च्या घरात प्रसाद जवादे व अमृता देशमुखची घट्ट मैत्री झाली होती. अमृताबरोबरच्या नात्याबद्दलही प्रसादने या व्हिडीओत खुलासा केला आहे.
-
“अमृता एक जवळची व्यक्ती झाली आहे. आम्हाला न बोलता बऱ्याचशा गोष्टी कळायच्या”, असं प्रसाद म्हणाला.
-
पुढे तो “आतापर्यंत मला भेटलेल्या व्यक्तींपैकी ती एक उत्कृष्ट व्यक्ती आहे. आमचं नातं हे निश्चितच मैत्रीच्या पलीकडे आहे”, असंही म्हणाला.
-
प्रसादने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
-
“मला सगळ्यात आधी अमृता देशमुखलाच फोन करायचा आहे. ती माझ्या आयुष्यामधील महत्त्वाचा भाग आहे”, असं प्रसाद म्हणाला.
-
पुढे तो “घराच्या बाहेर आल्यानंतर कोणाचे काय कसे विचार बदलतात हे सांगता येत नाही. पण मला तिला भेटायला, तिच्याबरोबर मैत्री करायलाही नक्की आवडेल. तिच्याबाबत माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे.”, असंही म्हणाला.
-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात आणखी एक सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसाठी टॉप ५ दावेदार असणार आहेत. येत्या ८ जानेवारीला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. (सर्व फोटो: voot)
“आमचं नातं मैत्रीपेक्षा…”, अमृता देशमुखबरोबरच्या नात्याबाबत प्रसाद जवादेचं मोठं वक्तव्य
Bigg Boss Marathi 4: अमृता देशमुखबरोबरच्या नात्याबाबत प्रसाद जवादेने केलेलं वक्तव्य चर्चेत
Web Title: Bigg boss marathi 4 prasad jawade said amruta deshmukh and me was definitely more than friends photos kak