• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why riteish deshmukh and genelia deshmukh first movie tujhe meri kasam is not available avn

रितेश-जिनिलीयाचा ‘तुझे मेरी कसम’ टीव्ही किंवा ओटीटीवर का बघायला मिळत नाही? जाणून घ्या

याचं चित्रीकरण रामोजी फिल्मसिटीमध्ये झालं. रामोजी राव हे या चित्रपटाचे निर्माते होते

January 3, 2023 19:13 IST
Follow Us
  • tujhe meri kasam 5
    1/12

    सध्या रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांची जोडी चांगलीच गाजतीये.

  • 2/12

    नुकताच या दोघांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

  • 3/12

    शिवाय जिनिलीया देशमुखचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई करत आहे.

  • 4/12

    आज ३ जानेवारी २०२३, आज रितेश आणि जिनिलीया या दोघांना चित्रपटसृष्टीत २० वर्षं पूर्ण झाली आहेत.

  • 5/12

    बरोबर २० वर्षांपूर्वी याच दिवशी रितेश आणि जिनिलीयाचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचं नाव होतं ‘तुझे मेरी कसम’.

  • 6/12

    या कॉलेज लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच शिवाय या चित्रपटातील गाणेही हिट ठरली.

  • 7/12

    रितेश आणि जिनिलीया दोघांचे आयुष्य बदलणारा हा चित्रपट ठरला. याच चित्रपटाच्यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली, आणि कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 8/12

    या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट आजवर कधीच टीव्हीवर प्रसारित झालेला नाही किंवा हा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध नाही.

  • 9/12

    यामागील कारण असं की या चित्रपटाचे डिजिटल हक्क निर्मात्यांनी कधीच विकले नाहीत.

  • 10/12

    याचं चित्रीकरण रामोजी फिल्मसिटीमध्ये झालं. रामोजी राव हे या चित्रपटाचे निर्माते होते.

  • 11/12

    त्यांच्यामते हा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर त्यांनी तो पुन्हापुन्हा चित्रपटगृहात येऊनच पहावा.

  • 12/12

    यामुळेच या चित्रपटाचे डिजिटल हक्क अजूनही निर्मात्यांकडेच असल्याने हा चित्रपट टेलिव्हिजनवर, डीव्हीडीवर किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. (फोटो : इंडियन एक्सप्रेस आणि आयएमडीबी)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Why riteish deshmukh and genelia deshmukh first movie tujhe meri kasam is not available avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.