-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, महाराष्ट्रातील तमाम महिलांचे भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस.
-
आजपर्यंतच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांची.
-
या दोघांचा प्रेमविवाह आहे.
-
सुचित्रा यांच्या घरून आदेश आणि त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पण त्यापूर्वीची यांची प्रेमकहाणी खूप हटके आहे.
-
आदेश बांदेकर यांनी सुचित्राला प्रपोज केल्यावर सुचित्रा यांनी त्या क्षणी आदेशला होकार दिला होता. यानंतर या दोघांचं भेटणं वाढू लागलं.
-
सुचित्राचे वडील खूप कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांचा या दोघांना खूप धाक वाटायचा. त्यांना अजिबात कळू न देता ही दोघं भेटत असत.
-
रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.
-
तेथून बाहेर निघताना ते गप्पा मारत असतानाच सुचित्रा यांचे वडील समोर आले.
-
सुचित्राने वडिलांना येताना पाहिले आणि लगेच आदेशला म्हणाल्या, “दादा आले.”
-
अचानक सुचित्राचे वडील तिथे पोहोचल्याने क्षणाचाही विलंब न करता आदेश यांनी तिथून पळ काढला आणि किचनमध्ये जाऊन लपले.
-
सुचित्राच्या वडिलांना ते आदेश बांदेकर होते असा संशय आला.
-
त्यामुळे त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना याबद्दल विचारणा केली. परंतु कोणीही ठोस उत्तर दिलं नाही.
-
तेवढ्यात आदेश आतमधून वेटरच्या कपड्यात आले आणि सुचित्रा यांच्या वडिलांसमोरून निघून गेले.
-
आदेश वेटरच्या कपड्यात असल्याने सुचित्राच्या वडिलांना त्यांना ओळखता आले नाही.
-
हा प्रसंग आजही त्या दोघांच्या लक्षात आहे.
…अन् आदेश भावोजींनी काढला होता सुचित्राच्या वडिलांसमोरून पळ, ‘अशी’ आहे दोघांची हटके लव्हस्टोरी
आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांची.
Web Title: Aadesh bandekar and suchitra bandekar shared his love story rnv