-
राखी सावंतच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.
-
सात महिन्यांपूर्वीच बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केलं असल्याचं राखीने काही दिवसांपूर्वीच सांगितलं.
-
त्यानंतर राखीने आदिलचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचं सांगितलं. शिवाय त्याच्या कुटुंबियांचा आदिलवर दबाव आहे असेही आरोप राखीने केले,
-
आदिलला हे लग्न लपवून ठेवायचं आहे असं राखी सतत म्हणत होती.
-
दरम्यान आदिलने सगळ्यांसमोर येत “होय मी राखी सावंतशी लग्न केलं आहे” असं म्हटलं.
-
या सगळ्या चर्चांदरम्यान राखीने आदिलबरोबरचे बरेच रोमँटिक व्हिडीओही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले.
-
आता राखीबाबत एक नवं सत्य समोर आलं आहे.
-
‘विरल भय्यानी’ या पापाराझीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीच्या गरोदरपणाबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, राखी गरोदर असल्याच्या बातमीला पुष्टी देण्यात आली आहे.
-
खुद्द राखीनेच तिच्या गरोदरपणाबाबत माहिती दिली असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
-
“हो मी गरदोर होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही हे मी सांगितलं होतं. पण घरातील सदस्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. मी जोक करतेय असं म्हणत त्यांनी हसण्यावारी घेतलं”, असं राखी म्हणाल्याचं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
तसंच राखीचा गर्भपात झाल्याचंही तिने सांगितलं असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
-
पण आता स्वतः आदिलनेच राखीचा गर्भपात झाला असल्याच्या निव्वळ अफवा आहेत असं म्हटलं आहे. आता हे नेमकं प्रकरण काय? राखी की आदिल नक्की कोण खरं बोलत आहे? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. (सर्व फोटो – फेसुबक)
गुपचूप लग्न, नवऱ्यावरचं दुसरंच अफेअर असल्याचे आरोप, अन् आता गर्भपात झाला असल्याचं म्हणतेय राखी सावंत, नक्की प्रकरण काय?
राखी सावंत व आदिल खानच्या नात्यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. राखीच्या गर्भपाताच्या चर्चांना उधाण आलं आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Rakhi sawant pregnancy and miscarriage rumours know about husband adil khan reaction see details kmd