-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
हॉलिवूडमध्ये बस्तान बसवल्यावर प्रियांका चांगलीच चर्चेत आली, सोशल मीडियावर ती तिचे बोल्ड अवतारातील फोटो शेअर करत असते.
-
मुलगी मालती मॅरीला जन्म दिल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे दोघे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान क्षणांचा आनंद घेत आहेत.
-
नुकतंच प्रियांका चोप्राने तिच्या मुलीबरोबर एक फोटोशूट केलं आहे.
-
इतकंच नाही तर प्रियांकाने सरोगसीबद्दलही भाष्य केलं आहे.
-
तिने सरोगसीचा निर्णय का घेतला? याचं नुकतंच उत्तर दिलं आहे.
-
प्रियांका म्हणाली, “माझ्या वैद्यकीय समस्या फार गंभीर आहेत. त्यामुळे सरोगसी हाच आमच्याकडे एकमेव उपाय होता.”
-
पुढे ती म्हणाली, “यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते, शिवाय ज्या सरोगेटने आमचं मूल ६ महीने जपलं त्यांचे मी मनापासून आभार मानते.”
-
प्रियांकाच्या सरोगसीवरुन तिला बरंच ट्रोल केलं जातं, बऱ्याच लोकांनी तिच्या या निर्णयावर टीका केली आहे.
-
याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी कोणत्या गोष्टींचा सामना करतीये हे माझं मला माहीत आहे, मी माझ्या मुलीबद्दल किंवा माझ्या वैद्यकीय समस्यांबद्दल उघडपणे भाष्य करत नाही याचा अर्थ इतरांना यावर टीका करायचा अधिकार मिळतो असं मुळीच नाही.”
-
तिने दिलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
-
गेल्यावर्षी प्रियांका आणि नीकच्या मालती मॅरीने १५ जानेवारी रोजी सरोगसीच्या माध्यमातून जन्म घेतला. (फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा / इन्स्टाग्राम)
सरोगसीवरुन ट्रोल करणाऱ्या लोकांना प्रियांका चोप्राने दिलं चोख उत्तर; मुलीबरोबर केलं खास फोटोशूट
तिने सरोगसीचा निर्णय का घेतला? याचं नुकतंच उत्तर दिलं आहे
Web Title: Bollywood actress priyanka chopra slams people who trolled her for surrogacy avn