-
मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेले दिग्दर्शक म्हणजे सुभाष घई.
-
मनोरंजनसृष्टीतील या दुसऱ्या शोमॅनचा आज वाढदिवस आहे.
-
त्यांनी ‘परदेस’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘ताल, यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
-
सुभाष घई यांनी त्यांची कारकीर्द अभिनयापासून सुरू केली, पण नंतर त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळवला.
-
८० आणि ९० च्या दशकात एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देणारे सुभाष घई सध्या या क्षेत्रापासून बरेच लांब आहेत, त्यांनी दिग्दर्शनही थांबवलं आहे, पण त्यांचं लिखाण आणि निर्मिती क्षेत्रात काम सुरू आहे.
-
सध्या सुभाष घई त्यांच्या मुंबईच्या अॅक्टिंग स्कूलकडे लक्ष देत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी ‘कांची द अनब्रेकेबल’ या शेवटच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. नंतर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि लिखाण केलं, पण दिग्दर्शन पूर्णपणे बंद केलं आहे.
-
सुभाष घई यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती का घेतली यांचं नेमकं कारण फक्त तेच सांगू शकतात, पण २०१८ मध्ये एका कॉंट्रोवर्सीनंतर त्यांनी या क्षेत्रापासून फारकत घ्यायला सुरुवात केली.
-
२०१८ मध्ये मीटू प्रकरणात एका तरुणीने सुभाष घई यांचं नाव घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी दिग्दर्शनापासून लांब राहायचा निर्णय घेतला असं म्हंटलं जातं.
-
मुंबई पोलिसांकडून त्यांना या प्रकरणात क्लीन चीटदेखील देण्यात आली, पण त्यानंतर आजपर्यंत सुभाष घई हे पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसले नाहीत, त्यांचे चाहते आजही त्यांच्या पुनरागमनाची वाट पहात आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
बॉलिवूडचे दुसरे शोमॅन सुभाष घई सध्या आहेत कुठे? दिग्दर्शनातून त्यांनी काढता पाय का घेतला? जाणून घ्या
२०१८ मध्ये एका कॉंट्रोवर्सीनंतर त्यांनी या क्षेत्रापासून फारकत घ्यायला सुरुवात केली
Web Title: Where is bollywoods showman subhash ghai now why he is not making a film since 2014 avn