• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress manasi naik birthday why she taking divorce from husband pradeep kharera know the real reason nrp

“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

“जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे”, असे मानसी नाईकने म्हटले होते.

Updated: February 3, 2023 09:03 IST
Follow Us
  • manasi naik 19
    1/24

    आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते.

  • 2/24

    मानसीची ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.

  • 3/24

    मानसी नाईकचा आज (३ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. पण सध्या ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

  • 4/24

    मानसी नाईकने काही महिन्यांपूर्वी तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले आहे. तिने याबद्दल अर्जही दाखल केला आहे.

  • 5/24

    काही महिन्यांपूर्वी मानसी नाईकने एका मुलाखतीत तिचे आणि तिच्या पतीचं नेमकं काय बिनसलं याबद्दलही खुलासा केला होता.

  • 6/24

    मानसी नाईक नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं.

  • 7/24

    “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही.”

  • 8/24

    “मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.

  • 9/24

    त्यानंतर मानसी नाईकने तिच्या घटस्फोटामागची कारण सांगितली आहे.

  • 10/24

    “आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे.”

  • 11/24

    “आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगात घडलं.”

  • 12/24

    “आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं.”

  • 13/24

    “अर्थात तेही सर्व खूपच घाईघाईत झालं.”

  • 14/24

    “मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं. या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे.”

  • 15/24

    “त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे.”

  • 16/24

    “पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान आणि स्वतःची काही मतंही महत्त्वाची आहेत.”

  • 17/24

    “एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊ एवढ्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.”

  • 18/24

    “मला आता या सगळ्या गोष्टी मागे सोडायच्या आहेत.”

  • 19/24

    “आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.”

  • 20/24

    “सध्या एक कलाकार म्हणून माझ्यासाठी माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, मी स्वतः आणि माझे प्रेक्षक, चाहते हेच महत्त्वाचं आहे.”

  • 21/24

    “कधी कधी तुमचा माणसांवरील विश्वास उडतो आणि हेच माझ्याबाबतीत घडलं.”

  • 22/24

    “मला भावनिकदृष्ट्या आधाराची गरज होती. पण दुर्दैवाने त्या नात्यात असं काहीच घडलं नाही.”

  • 23/24

    “जर एकाच व्यक्तीला कायम समर्थन मिळत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ते मिळत नसेल तर मला वाटतं अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं.”

  • 24/24

    “जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे”, असे मानसी नाईकने म्हटले होते.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress manasi naik birthday why she taking divorce from husband pradeep kharera know the real reason nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.