-
राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे.
-
आता आदिलला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
आदिलचे दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर असल्याचं राखीने प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं.
-
या दोघांमधील वाद आत चर्चेचा विषय ठरला आहे.
-
पण याआधीने राखीनेच आदिलचं प्रसारमाध्यमांसमोर कौतुक केलं होतं. आदिलने तिच्यासाठी महागडी गाडी, महागडा फोन गिफ्ट केला असल्याचं म्हटलं.
-
आता या दोघांमध्ये बिनसलं आहे. जेव्हा राखी व आदिल यांच्या नात्याला सुरुवात झाली तेव्हा तिने दुबईमध्ये घरही खरेदी केलं होतं.
-
राखीने दुबईमधल्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केला होता.
-
घराचा व्हिडीओ पाहता यासाठी लाखो रुपायांचा खर्च करण्यात आला असणार असं दिसून आलं.
-
इतकंच नव्हे तर घराची रचना, इंटेरियर तसेच घरातील प्रत्येक वस्तू ही लक्ष वेधून घेणारी आहे.
-
“माझं स्वप्न सत्यात उतरलं.” असं राखीने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होतं.
-
यावेळी तिने बेडरुम, स्वयंपाकघराची झलक राखीने या व्हिडीओमध्ये दाखवली होती.
Photos : आदिल खानबरोबर प्रेमाची कबुली देताच राखी सावंतने दुबईमध्ये खरेदी केलं होतं महागडं घर, पाहा फोटो
राखी सावंतने आदिल खानबरोबर नात्याची सुरुवात होताच दुबईमध्ये महागडं घर खरेदी केलं होतं. याचीच झलक आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Rakhi sawant adil khan durrani marriage in trouble see actress dubai home photos kmd