-
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं.
-
अमृताने अभिनेता हिमांशू मल्होत्राशी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
नुकतंच अमृताने प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पतीने अनफॉलो केल्यांच म्हटलं होतं.
-
हिमांशूने अमृताला अनफॉलो केल्याने त्यांच्यात काही बिनसलं आहे का? अशा चर्चा रंगल्या होत्या.
-
अमृताने यावर उत्तर देत हिमांशूने अनफॉलो करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
-
अमृता म्हणाली, “हिमांशू अध्यात्मिकरित्या फार जागरुक आहे. तो स्वत:च स्वत:चे शिबीर घेतो”.
-
“जेव्हा तो असं काही करणार असतो, तेव्हा तो मला सांगतो. आता मी महिनाभर सोशल डिटॉक्स करणार आहे. त्यामुळे महिनाभर मी तुला अनफॉलो करत आहे, तू ही मला अनफॉलो कर, असं तो मला सांगतो”.
-
“हिमांशु स्वत:च माझा फोन घेतो आणि मला अनफॉलो करतो. आधी मी या गोष्टीवरुन खूप भांडायचे. आता १८ वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे मलाही याची सवय झाली आहे”.
-
“आता जेव्हा आमचं भांडण होतं, तेव्हा मी त्याला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणते. मग तो फोनवरुन मला मेसेज करतो. तुला समोरासमोर बोलायचं नव्हतं, म्हणून मी मेसेज करतोय, असं तो मला बोलतो”, असंही अमृता पुढे म्हणाली.
-
पुढे अमृता म्हणाली, “आमच्याकडे सोशल मीडिया खेळण्यासारखं वापरलं जातं”.
-
“आताही हिमांशूने मला अनफॉलो केलं आहे. सध्या तो कुणालाच फॉलो करत नाहीये”.
-
अभिनेत्रीबरोबरच अमृता एक नृत्यांगणाही आहे.
-
‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ यांसारख्या गाण्यांमधून तिने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
-
(सर्व फोटो: अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
अमृता खानविलकरला नवऱ्याने अनफॉलो का केलं? समोर आलं खरं कारण; अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली…
“…म्हणून हिमांशूने मला अनफॉलो केलं”, अमृता खानविलकरने सांगितलं खरं कारण
Web Title: Amruta khanvilkar husband himanshu malhotra unfollow her actress revealed the reason kak