-
अभिनेत्री सुश्मिता सेनने वयाची ४५शी ओलांडली आहे.
-
पण आजही ती बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना सौंदर्य व फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते.
-
योगा व नियमित व्यायाम सुश्मिता करते.
-
आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्या अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
तिने आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.
-
काही दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला.
-
इतकंच नव्हे तर तिला होणारा त्रास पाहता सुश्मिताची अँजिओप्लास्टीही करण्यात आली.
-
वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली.
-
सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला हे ऐकूनच चाहते चिंतेत पडले आहेत.
-
सुश्मिता म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीही झाली.”
-
“आता ठिक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी माझं हृदय मोठं आहे याची मला खात्री पटवून दिली.”
-
“यादरम्यान बऱ्याच लोकांनी मला मदत केली. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन”.
-
“ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या व्यक्तींसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती.”
-
“मी नवीन आयुष्यासाठी आता तयार आहे”.
-
सुश्मिताच्या या पोस्टनंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहते तू लवकर यामधून बरी हो, तुझी काळजी घे असं कमेंट करत म्हणत आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची झाली अँजिओप्लास्टी, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “मी आता…”
अभिनेत्री सुश्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर करत दिली. पण आता तिची प्रकृती नेमकी कशी आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Sushmita sen suffer from herat attack know about her health update see details kmd