-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले.
-
गेले काही दिवस सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
-
या त्यांच्या लग्नाला त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि बॉलिवूडमधील त्यांच्या काही जीवाभावाची मंडळीही उपस्थित होती.
-
या लग्नाला ईशा अंबानीही उपस्थित होती.
-
ईशा अंबानी ही कियारा अडवाणीची खास मैत्रीण. गेली अनेक वर्ष त्या एकमेकींना ओळखतात.
-
आतापर्यंत या लग्नातील तिचा एकही फोटो समोर आला नव्हता.
-
आता अखेर या लग्न सामारंभातील कियारा आणि ईशाचा एक फोटो समोर आला आहे.
-
या फोटोमध्ये कियाराबरोबर कियाराची बहीण अनिसा मल्होत्रा आणि ईशा अंबानी दिसत आहेत. हा फोटो कियाराच्या संगीत सेरेमनीच्या वेळचा आहे. या कार्यक्रमाच्या वेळी तिघींनीही घागरे परिधान केलेले दिसत असून त्या त्यांनी एकमेकींना मिठी मारत हा फोटो काढला आहे.
-
तो फोटो व्हायरल झाल्याने ईशा अंबानीचा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील लूकही समोर आला आहे.
‘असा’ होता सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्न समारंभातील ईशा अंबानीचा लूक, Unseen Photo व्हायरल
ईशा अंबानी ही कियारा अडवाणीची खास मैत्रीण. लहानपणीपासून त्या एकमेकींना ओळखतात.
Web Title: Isha ambani unseen photo from siddharth malhotra and kiara advani wedding rnv