-
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे.
-
ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाकार मंडळी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
-
त्यांनी आजवर बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं.
-
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
-
सतीश यांनी निधनाच्या एक दिवस आधी जोरदार होळी सेलिब्रेशनही केलं.
-
यादरम्यानचे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
सतीश यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत अनुपम खेर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
-
‘पीटीआय’शी संवाद साधताना अनुपम यांनी सांगितलं की, “सतीश दिल्ली येथे त्यांच्या मित्राच्या घरी होते.”
-
“त्यांना मित्राच्या घरीच अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी ड्रायव्हरला मला रुग्णालयामध्ये घेऊन चल असं सांगितलं.”
-
“रुग्णालयामध्ये जात असतानाच त्यांना गाडीमध्येच हृदयविकाराचा झटका आला. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली”.
-
‘एएनआय’च्या वृत्तानुसार, आज दिल्ली येथील दिन दयाल रुग्णालयामध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम होणार आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
सतीश कौशिक यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? मध्यरात्रीच रुग्णालयामध्ये जात होते पण…
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाच्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत अनुपम खेर यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
Web Title: Satish kaushik passed away at the age of 66 anupam kher talk about his death details says actor suffer from heart attack see details kmd