-
सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
-
पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
-
सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली.
-
पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप करत आहे.
-
सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचा आरोप सान्वी सातत्याने करत आहे.
-
विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते.
-
त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याचं सान्वी म्हणत आहे.
-
आता या सगळ्या प्रकरणावर सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी मौन सोडलं आहे.
-
‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना शशी म्हणाल्या, “पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे. यानंतरही सतीश यांची हत्या करण्यात आली असं ती (सान्वी मालू) का बोलत आहे? हे कळत नाही”.
-
“पोलिसांनीही या प्रकरणामध्ये तपास करावा असंही मला वाटत नाही. कारण जे काही घडलं ते सगळं समोर आहे”.
-
पुढे त्या म्हणाल्या, “सतीश यांच्या निधनानंतरही अशा गोष्टींची चर्चा होत आहे हे खूप चुकीचं आहे.तिला तिच्या पतीकडून पैसे हवे आहेत. म्हणून सतीश यांना ती यामध्ये सहभागी करुन घेत आहे”.
-
“मी तिला विनंती करते की, कृपया असं काही करू नको. जर सतीश यांनी १५ कोटी रुपयांची उलाढाल केली असती तर त्यांनी मला तसं सांगितलं असतं”.
-
“मला या प्रकरणाबाबत आणखी काही बोलायचं नाही. याची पोलीस चौकशी व्हावी अशीही माझी इच्छा नाही”.
-
शशी कौशिक यांनी संपूर्ण आरोप फेटाळले आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)
पैशांसाठी हत्या, वाद अन्…; व्यावसायिकाच्या पत्नीच्या आरोपांनंतर सतीश कौशिक यांच्या पत्नीचा संताप, म्हणाल्या, “पैसे हवे म्हणून…”
“१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” म्हणणाऱ्या व्यावसायिकाच्या पत्नीला शशी कौशिक यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाल्या शशी कौशिक? हे जाणून घेऊया.
Web Title: Satish kaushik wife shashi kaushik talk about woman who claims her businessman husband had to pay 15 crore see details kmd