• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor tanaji galgunde talk about his journey after sairat movie success see details kmd

‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने पायासाठी खर्च केले ‘इतके’ लाखो रुपये, आर्थिक परिस्थिती सुधारली, म्हणाला, “शस्त्रक्रिया झाली आणि…”

‘सैराट’ चित्रपटानंतर तानाजी गालगुंडेचं आयुष्य कसं बदललं? अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा प्रवास.

Updated: April 14, 2023 18:25 IST
Follow Us
  • tanaji galgunde on sairat tanaji galgunde
    1/12

    दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास रचला.

  • 2/12

    २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सारे विक्रम मोडले. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रकाश झोतात आले.

  • 3/12

    या चित्रपटामध्ये ‘लंगड्या’ची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचं तर आयुष्यच बदललं.

  • 4/12

    ‘सैराट’नंतर तानाजीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याने पुढेही काही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 5/12

    तानाजीने ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटाच्यानिमित्ताने त्याचं आयुष्य कशाप्रकारे बदललं याबाबत भाष्य केलं.

  • 6/12

    शिवाय इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे तानाजीला चालत येत नव्हतं. आता त्याने स्वतःवर लाखो रुपये खर्च केला आहे.

  • 7/12

    तानाजी म्हणाला, “चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मी शेती करत होतो. शेती करत करत मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. पण माझ्या या कामाला मर्यादा होत्या. तेच काम करत राहिलो असतो तर मी अजूनही गावातच असतो”.

  • 8/12

    “माझी प्रगती झाली नसती. चित्रपटांमध्ये काम करत असताना माझा अवाका वाढला. सगळ्यात महत्त्वाचं मला चांगली माणसं मिळाली. टीम चांगली मिळाली”.

  • 9/12

    “चार पुस्तकं वाचता आली. आता हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे”.

  • 10/12

    “माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले. माझ्या पायाची एक वेगळीच गोष्ट आहे. माझ्या पायांची मी शस्त्रक्रिया करुन घेतली. शेतीचं करत राहिलो असतो तर माझे पाय कधीच नीट झाले नसते”.

  • 11/12

    “आतापर्यंत मी आठ ते दहा लाख रुपये पायावर खर्च केले. हे सगळं श्रेय फक्त ‘सैराट’ चित्रपटाला आहे. माझे दोन्हीही पाय आता जवळपास सरळ झाले आहेत. याचाच अर्थ आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम झालो”.

  • 12/12

    “सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुखकर झालो. मला पाहिजे ती गोष्ट मी करतो. अण्णांमुळे (नागराज मंजुळे) मी इथे आहे”. (सर्व फोटो – फेसबुक, इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actor tanaji galgunde talk about his journey after sairat movie success see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.