• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahid kapoor appreciate maharashtrachi hasyajatra fame vanita kharat performance in kabir singh kak

‘कबीर सिंग’मधील काम पाहून शाहीद कपूर वनिता खरातला काय म्हणाला? अभिनेत्रीने केला खुलासा

वनिता खरातने शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

April 18, 2023 11:27 IST
Follow Us
  • vanita-kharat-shahid-kapoor
    1/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.

  • 2/15

    विनोदाची उत्तम जाण असणारी वनिता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. मराठीबरोबरच वनिताने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे.

  • 3/15

    ‘कबीर सिंग’ चित्रपटात वनिता झळकली होती. या चित्रपटात तिने शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

  • 4/15

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने बॉलिवूड इंडस्ट्री व शाहीद कपूरबद्दल भाष्य केलं.

  • 5/15

    शाहीदबरोबर काम करण्याचा अनुभव वनिताने शेअर केला.

  • 6/15

    वनिता म्हणाली, “सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. पण, आपलं काम चांगलं असलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.”

  • 7/15

    “बॉलिवूडमधील लोक कलाकारांचा आदर करतात. त्यांनी कधी आपल्याला बघितलेलंच नसतं. त्यामुळे ते एकदम नॉर्मल वागतात,” असंही ती म्हणाली.

  • 8/15

    “पण काम बघितल्यावर ते खूप कौतुक करतात. हे मला ‘कबीर सिंग’च्या बाबतीत जाणवलं,” असंही वनिताने सांगितलं.

  • 9/15

    वनिताने ‘कबीर सिंग’मध्ये काम केल्यानंतर शाहीद कपूरची प्रतिक्रिया काय होती, याबाबतही भाष्य केलं.

  • 10/15

    “मी शाहीदबरोबर पहिला सीन केल्यानंतर माझ्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. सुरुवातीला तो येऊन भेटला, बोलला,” असं वनिताने सांगितलं.

  • 11/15

    ती म्हणाली, “सीन शूट झाल्यानंतर तो एकदमच भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली.”

  • 12/15

    “चित्रपटानंतर मी शाहीद कपूरबरोबर एका अवॉर्ड शोमध्येही काम केलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला. बॉलिवूडमध्ये मला खूप चांगली वागणूक मिळाली,” असंही वनिताने सांगितलं.

  • 13/15

    ‘कबीर सिंग’ चित्रपटातील वनिता मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं.

  • 14/15

    (सर्व फोटो : वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही वाचा>>१३ कोटीं रुपयांच्या घराची किंमत झालीए २०० कोटी रुपये: शाहरुख खान ते प्रियांका चोप्रापर्यंत ‘या’ कलाकारांकडे आहेत महागडी घरे)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressशाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Shahid kapoor appreciate maharashtrachi hasyajatra fame vanita kharat performance in kabir singh kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.