-
तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
तिच्या कामाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.
-
तेजस्वीला तिचं नाव विचारल्यावर ते तेजस्वी प्रकाश इतकंच सांगते.
-
मराठमोळ्या तेजस्वीचं आडनाव काय, असा प्रश्न प्रेक्षकांना नेहमीच पडतो.
-
आता तेजस्वीनेच याचा खुलासा करत तिचं आडनाव सांगितलं आहे.
-
हिंदी मालिका विश्वामध्ये यश मिळवलेल्या तेजस्वीने काही महिन्यांपूर्वी ‘मन कस्तुरे रे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.
-
आता ती रोहित शेट्टीचा पहिलावहिला मराठी चित्रपट ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’मध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे.
-
गेले काही दिवस या चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करताना दिसत होती. याच निमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिचं आडनाव काय हे चाहत्यांना सांगितलं.
-
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. कारण मी तेजस्वी प्रकाश असं नाव लावते.”
-
“सर्वांना वाटतं की मी साउथ इंडियन आहे आणि प्रकाश माझं आडनाव आहे.”
-
“पण माझं आडनाव वायंगणकर आहे.”
-
तिचं हे बोलणं ऐकून तिच्या बाजूला बसलेला रोहित शेट्टी देखील आश्चर्यचकित झाला. कारण तेजस्वीचं आडनाव काय हे आतापर्यंत त्यालाही माहित नव्हतं.
तेजस्वी प्रकाशचं आडनाव काय हे माहीत आहे का? अखेर स्वतः अभिनेत्रीनेच केला खुलासा
हिंदी मालिका विश्वामध्ये यश मिळवलेल्या तेजस्वीला तिचं नाव विचारल्यावर ते तेजस्वी प्रकाश इतकंच सांगते.
Web Title: Actress tejaswi prakash revealed what is her surname and made fans shocked rnv