-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांना लाँच केले आहे.
-
इतकंच नाही तर अनेक कलाकारांचे करिअर वाचवण्यातही सलमान खानचे मोठे योगदान आहे. या यादीमध्ये अनेक मोठ्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
-
आज आपण अशा बॉलिवूड कलाकारांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्या कठीण काळात सलमान खानने त्यांना मदत केली होती.
-
९० च्या दशकात सुपरस्टार गोविंदा प्रसिद्धीच्या शिखरावर होता. असाही एक काळ होता जेव्हा तो एकाचवेळी ५० चित्रपट असे. या चित्रपटांमधून त्याने बक्कळ कमाई केली. मात्र कालांतराने त्याची प्रसिद्धी कमी होत गेली आणि त्याचे करिअर फ्लॉप होण्याच्या नजीक पोहोचले.
-
अशा परिस्थितीत गोविंदाने सलमानकडे मदत मागितली आणि सलमाननेही त्याला ‘पार्टनर’ चित्रपटाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. यामुळे गोविंदाचे करिअर पुन्हा रुळावर येण्यास मदत झाली.
-
बॉबी देओलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तथापि, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली की त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते कारण त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होत होते.
-
अशा परिस्थितीत सलमान खानने त्याला मदत केली. बॉबीने एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते की, जर सलमान खानने त्याला ‘रेस 3’ मध्ये कास्ट केले नसते तर त्याचे संपूर्ण करिअर संपुष्टात आले असते.
-
नील नितीन मुकेश जरी तो त्याच्या कारकिर्दीत विशेष काही करू शकला नाही, तरी तो नेहमीच त्याच्या लूकसाठी प्रसिद्ध ओळखला गेला आहे.
-
अशा परिस्थितीत त्यांची कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. यावेळी सलमानने त्याला ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
-
अरमान कोहलीचे करिअर वाचवण्यासाठी सलमान खानने त्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात भूमिका दिली होती.
-
सलमानने अश्मित पटेलला त्याच्या ‘जय हो’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
-
सलमान खानने अभिनेत्री डेजी शाहला एकदा नव्हे तर अनेक वेळा संधी दिली आहे. प्रथम त्याने तिला ‘जय हो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले.
-
मात्र, तिचे करिअर अपयशी ठरल्यानंतर सलमानने तिला ‘रेस 3’ चित्रपटात पुन्हा एकदा संधी दिली.
-
सलमान खानने अभिनेत्री कतरिना कैफचे फ्लॉप करिअर वाचवले आणि तिला दुसरी संधी दिली. दोघेही ‘एक था टायगर’मध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट हिट झाला आणि कॅटचे करिअर वाचले.
-
(सर्व फोटो : Instagram)
सलमान खानने वाचवले ‘या’ सुपरस्टार्सचे बुडणारे करिअर; आज जगतायत ऐशोआरामाचे जीवन
आज आपण अशा बॉलिवूड कलाकारांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्या कठीण काळात सलमान खानने त्यांना मदत केली होती.
Web Title: Salman khan saved these superstars sinking careers today they are living a luxury life pvp