• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bharat jadhav revealed reason why he left mumbai and settle in kolhapur rnv

भरत जाधवने कुटुंबासह सोडली आहे मुंबई, स्वतः यामागचं कारण उघड करत म्हणाला…

काही महिन्यांपूर्वी भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला स्थायिक झाला आहे.

May 10, 2023 15:32 IST
Follow Us
  • गेली अनेक वर्षे अभिनेता भरत जाधव हा त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आला आहे.
    1/12

    गेली अनेक वर्षे अभिनेता भरत जाधव हा त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आला आहे.

  • 2/12

    काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला.

  • 3/12

    गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे.

  • 4/12

    त्याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत होता, त्याच्या नाटकाचे प्रयोगही हाऊसफुल होत होते.

  • 5/12

    पण अशातच त्याने कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते अवाक झाले. 

  • 6/12

    आता हा निर्णय घेण्यामागे काय विचार केला होता याचा खुलासा त्याने केला आहे.

  • 7/12

    ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी मी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे.”

  • 8/12

    “त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.”

  • 9/12

    “मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.”

  • 10/12

    “या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले.”

  • 11/12

    “या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले.”

  • 12/12

    “आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.”
    (सर्व फोटो सौजन्य: भरत जाधव/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Bharat jadhav revealed reason why he left mumbai and settle in kolhapur rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.