-
छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
-
त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीला एक वेगळीच ओळख मिळाली.
-
शिवाली परबने नुकतंच ‘सकाळ पॉडकास्ट’ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत तिने तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात कशी संधी मिळाली? याबद्दल भाष्य केले.
-
“माझ्या घरात सिनेसृष्टीशी संबंधित कोणीही नव्हते.”
-
“मी सुरुवातीला एकांकिका, नाटक या क्षेत्रात काम करायचे.”
-
“त्यानंतर मग मी जोगेश्वरीमधील एक ग्रुप जॉईन केला.”
-
“त्यांनी बदलापूरला ‘आगरी महोत्सव’ म्हणून एक कार्यक्रम घेतला होता.”
-
“त्यात मी असिस्टंट म्हणून काम करत होते.”
-
“यावेळी नम्रता ताई आणि अरुण काका हे दोघेही त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते.”
-
“तिथे आगरी महोत्सव असल्याने आगरी भाषेत बोलायचं होतं. पण तिथे मुलांना ती भाषा येत नव्हती.”
-
“मला ती भाषा येत होती. तेव्हा नम्रता ताईने आपण हिलाही यात घेऊ या, हिला आगरी बोलता येतंय, असं सांगितलं.”
-
“मी त्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हा संपूर्ण कार्यक्रम केला.”
-
“नम्रता ताईला हे सर्व खूप आवडलं.”
-
“माझा परफॉर्मन्स बघितल्यानंतर नम्रता ताई आणि तिचे पती योगेश दादा यांना तो आवडला.”
-
“त्यांनी माझे कौतुक केले. त्याबरोबरच त्या दोघांनी मला व्हॅनिटीमध्ये बोलवलं.”
-
“त्यावेळी त्यांनी मला आमच्याकडून तुला एक काम नक्की देऊ, असे सांगितलं.”
-
“मी माझ्याकडून तुला नक्की एक काम देईन, असे नम्रता संभेराव ताईने सांगितलं.”
-
“त्यानंतर एक दिवस मला फोन आला. तो फोन हास्यजत्रेच्या ऑडिशनचा होता.”
-
“त्यावेळी त्या फोनवर त्यांनी नम्रता संभेरावने तुमचा रेफरन्स दिला आहे, असे सांगितले.”
-
“तेव्हा मला खूपच भारी वाटलं होतं. त्यामुळे मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही संधी नम्रता ताईमुळे मिळाली.”
-
“मी कायमच तिचं नाव सांगत असते आणि तिचे आभार मानते”, असे शिवालीने सांगितले.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…”
“बदलापूरचा आगरी महोत्सव, आगरी भाषा अन्…” शिवाली परबला ‘अशी’ मिळाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी
Web Title: Actress shivali parab talk about how she enter into maharashtra hasyajatra know the details nrp