-
कविता लाड – मेढेकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.
-
गेली अनेक वर्षं त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
तर मोठ्या कालावधीनंतर सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत.
-
कविता मेढेकर यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
-
त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.
-
फिटनेसच्या बाबतीत अनेक जणी त्यांना फॉलो करताना दिसतात.
-
तर आता त्या नक्की काय करतात की त्यांचं आरोग्य इतकं निरोगी राहतं, हे गुपित त्यांनी उघड केलं आहे.
-
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मनोरंजनसृष्टीत काम करत असताना शूटिंग, जेवण, व्यायाम कसलीच वेळ निश्चित नसते तरीही तुम्ही इतक्या फिट कशा, असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. पण मी म्हणेन की याचं उत्तर स्वयंशिस्त आहे.”
-
“हे क्षेत्र ग्लॅमरस असलं, तरी इथे टिकून राहण्यासाठी शिस्त लागते.”
-
“या क्षेत्रात काम करताना बारा तासांचीही शिफ्ट असते पण अनेकांना ते जमत नाही. या क्षेत्रात दुसरा पर्याय नाही.”
-
“शांत झोप घेतली की दुसऱ्या दिवशी काम करताना उत्साह असतो आणि रोज शांत झोप येण्यासाठी मनासारखं, प्रामाणिकपणे, निष्ठेने काम केलं पाहिजे.”
-
“स्वतःची योग्य काळजी घेतली तर ताण जाणवत नाही. त्याचबरोबर रोज स्वत:शी साधलेला संवाद सकारात्मक ऊर्जा देऊन जातो.”
कविता मेढेकरांनी उलगडलं त्यांच्या फिटनेसचं गुपित, ‘अशी’ घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी
कविता मेढेकर कामाबरोबरच त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.
Web Title: Actress kavita medhekar shared her fitness secret saying descipline is important rnv