-
सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यामुळे अभिनेत्री उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
-
सारा अली खान उज्जैनच्या मंदिरात गुलाबी रंगाची साडी नेसून गेली होती.
-
अभिनेत्रीने शनिवारी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आरती केली.
-
जवळपास तासभर सुरु असलेल्या सगळ्या धार्मिक विधींमध्ये सारा उपस्थित होती.
-
साराने महाकाल मंदिरात पूजा केल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलचे व्हायरल झाले आहेत.
-
व्हायरल फोटो-व्हिडीओ पाहून, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अभिनेत्रीला मंदिरात जाण्यावरून ट्रोल केले आहे.
-
एका युजरने “सारा उगाच ओव्हर अॅक्टिंग करतेय”, तर दुसऱ्या एका युजरने “प्रत्येक चित्रपटात धर्माचा अँगल जोडून चित्रपट हिट कसे करायचे हे बॉलीवूडकरांना चांगलेच माहितीये” अशा कमेंट अभिनेत्रीच्या फोटोंवर केल्या आहेत.
-
मंदिरात जाण्यावरून किंवा देवाची पूजा करण्यावरून सारा अली खान ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला या मुद्द्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट जगभरात लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. यामध्ये सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती.
“प्रत्येक चित्रपटात धर्माचा अँगल…”, उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल
सारा अली खानने उज्जैनच्या महाकाल मंदिरात घेतले दर्शन
Web Title: Sara ali khan offers prayers at ujjain mahakaleshwar video viral sva 00