-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं.
-
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
-
त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
गेली साडेतीन ते चार वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
-
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांचं नातं सर्वांसमोर आणल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती.
-
त्यामुळे प्रथमेश व मुग्धाने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास प्रश्न उत्तरांचं सेशन आयोजित केलं होतं.
-
त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी दोघांनी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी सांगितली.
-
प्रथमेशने मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांमध्ये पदवी मिळवली आहे.
-
याचबरोबर त्यानंतर त्याने पुण्याच्या भारती विद्यापीठातून MA in Music पूर्ण केलं आहे.
-
तर दुसरीकडे, मुग्धाने रुपारेल कॉलेजमधून BSC with Statistics केलं आणि त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून MA in Music ही पदवी मिळवली.
-
गेल्याच महिन्यात मुग्धाच्या या मास्टर्स डिग्रीचा निकाल लागला आणि त्यात तिला सुवर्णपदकही मिळालं
-
या दोघांचं शिक्षण काय हे कळल्यावर आता सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं.
Web Title: Prathamesh laghate and mugdha vaishampayan reveals their qualification rnv