• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. national award winning marathi singer savani ravindra shared experience of her depression rnv

“एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार अन् दुसरीकडे माझी २ महिन्याची लेक ५ तास उपाशी…”; प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने सांगितला डिप्रेशनचा अनुभव

तिला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यादरम्यान तिने डिप्रेशनचा सामना केला.

August 1, 2023 18:33 IST
Follow Us
  • गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली.
    1/15

    गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली.

  • 2/15

    सावनीला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यादरम्यान तिने डिप्रेशनचा सामना केला असल्याचं तिने आता सांगितलं आहे.

  • 3/15

    ती म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा माझी मुलगी २ महिन्यांची होती. ती पूर्णपणे फिडींगवर होती.”

  • 4/15

    “एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याचा आनंद होता, पण दुसरीकडे पाच तास मी ऑडिटोरियममध्ये असणार आहे आणि पाच तास माझं बाळ उपाशी राहाणार आहे याचं टेंशन होतं.”

  • 5/15

    “तिला माझ्यापासून दूर ठेवून, उपाशी ठेवून मी पुरस्कार घ्यायला कुठे जाऊ? असं मला वाटत होतं. मी तिची सगळी सोय करून ठेवली होती. आई-बाबांना तिला फॉर्म्युला द्या असं सांगितलं होतं.”

  • 6/15

    “तेव्हा मलाही कळत नव्हतं  मला काय होतंय. मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. पण त्या डिप्रेशनमुळे मला त्याचा आनंद घेता येत नव्हता.”

  • 7/15

    “माझ्या शरिरात हार्मोनल इम्बॅलन्स होत असल्यामुळे तेव्हा मला काही कळत नव्हतं. मी ५ तास तिच्याशिवाय कशी राहू या चिंतेत मी होते.”

  • 8/15

    “तेव्हा मला कळलं की आपलं बाळ आपल्याला काम करण्याची ताकद देत असतं. त्या दिवशी माझी मुलगी ५ तास उपाशी राहिली.”

  • 9/15

    “आई बाबांनी फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही खाल्लं नाही.”

  • 10/15

    “मी पुरस्कार घेतल्यावर तिथल्या काही लोकांनी मला पुढच्या मुलाखतीसाठी दुसरीकडे नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, प्लिज मला हॉटेलला जाऊ द्या. माझं बाळ उपाशी आहे.”

  • 11/15

    “तेव्हा आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे माझं २ महिन्यांचं बाळ आणि दुसरीकडे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी मुलाखत होणार होती.”

  • 12/15

    “तेव्हा नवऱ्याने मला धीर दिला. मी कशीबशी ती मुलाखत दिली.”

  • 13/15

    “या सगळ्यात ५ तासांहून अधिक वेळ झाला होता. पण त्या मुलीने तोंडातून आवाजही काढला नाही, ती अजिबात रडली नाही.”

  • 14/15

    “मी हॉटेलवर गेल्यावर मुलीला घट्ट मिठी मारली. या सगळ्यात माझ्या बाळाने मला खरंच खूप ताकद दिली.”

  • 15/15

    आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: National award winning marathi singer savani ravindra shared experience of her depression rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.