-
अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. आज आम्ही तुम्हाला काजोलबाबत सांगणार आहोत अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला ठाऊक नसतील. (फोटो-फेसबुक पेज-काजोल आणि अजय देवगण)
-
काजोल ही अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आहे. काजोलचं हसू अगदी तिच्या आईसारखं म्हणजेच तनुजा यांच्यासारखं आहे.
-
काजोल ही बॉलिवूडची चुलबुली, नटखट आणि तेवढीच हुशार, सुंदर अभिनेत्री आहे.
-
५ ऑगस्ट १९७४ या दिवशी काजोलचा जन्म झाला. आज तिचा वाढदिवस आहे.
-
काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची पहिली भेट १९९३ ला हलचल या सिनेमाच्या सेटवर झाली होती.
-
काजोल अजय देवगणला पहिल्यांदा भेटली तेव्हा तो तिला प्रचंड गर्विष्ठ आणि घमंडी वाटला होता. काजोलने स्वतःच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
-
मात्र हळू हळू काजोल आणि अजय देवगण यांच्यातली मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
अजय आणि काजोल या दोघांनी २४ फेब्रुवारी १९९९ ला लग्न केलं. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलं. पण त्यांच्या या मराठमोळ्या लग्नाची चर्चा आजही होते.
-
काजोल आणि अजय देवगण यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव नीसा तर मुलाचं नाव युग असं आहे.
-
काजोल आणि अजय या दोघांनी हलचल, इश्क, प्यार तो होना ही था, यू मी और हम, तान्हाजी या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर आहे.
-
काजलने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसही अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
करण अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिलवाले, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है अशा एकाहून एक सरस चित्रपटात काजोल आणि शाहरुख यांची जोडी सुपरहिट राहिली आहे.
-
काजोलने नुकतंच हॉट स्टार वरच्या एका वेबसीरीजमधून ओटीटीवरही पदार्पण केलं आहे.
-
सपने या सिनेमात काजोलने प्रभू देवा आणि अरविंद स्वामीसह काम केलं आहे.
-
काजोलने त्रिभंगा या सिनेमात केलेल्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं. तसंच काजोलने आत्तापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सलाम वेंकीतला तिचा रोलही चर्चेत होता. तसंच लस्ट स्टोरीज टू या सिनेमातला तिचा रोलही वेगळा होता. आज काजोलचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने तिला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Special : काजोलला पहिल्या भेटीत अजय देवगण का वाटला होता गर्विष्ठ?
अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे, जाणून घ्या तिच्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी
Web Title: Kajol thought ajay devgan is arrogant in the first meeting do you know this things about kajol scj