-
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
-
ओम शांती ओम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या कामाचं कौतुकही झालं आहे. एवढंच नाही दीपिकाचा एक चाहता वर्गही तयार झाला आहे.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिका कायमच चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहात असते. अनेकदा ती तिचे आणि तिचा पती रणवीर सिंहचे फोटोही पोस्ट करते. रामलीला या सिनेमा या दोघांची केमिस्ट्री जुळली. मग दोघांनी लग्नही केलं.
-
रणवीरशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरही होता. मात्र या दोघांचं नातं दीर्घकाळ टीकलं नाही.
-
दीपिका पदुकोणचं लव्ह लाईफ हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. तु्म्हाला ठाऊक आहे पण दीपिकाला तिच्याच सिनेमात काम करणारा व्हिलन खूप आवडला होता.
-
दीपिकाचं नाव खरंतर अनेकांशी जोडलं गेलं. पण दीपिका आणि रणवीर सिंह विवाहबद्ध झाले आणि या चर्चा थांबल्या.
-
रणवीरच्या आधी रणबीर कपूर तिच्या आयुष्यात होता. मात्र काही वर्षांत हे नातं संपुष्टात आलं.
-
मात्र रणबीर, रणवीरपेक्षाही एका अभिनेत्यावर आणि तिच्याच सिनेमातल्या व्हिलनवर तिचा क्रश होता. दीपिकानेच काही वर्षांपूर्वी या नावाचा खुलासा केला होता.
-
दीपिकाने या मुलाखतीत सांगितलं होतं की तिला अर्जुन रामपाल खूप आवडला होता. ओम शांती ओम या सिनेमात अर्जुन रामपाल व्हिलन होता. पण त्याची पर्सनालिटी दीपिकाला खूप भावली होती.
-
ओम शांती ओम हा सिनेमा हिट झाल्यानंतर दीपिकाकडे चित्रपटांची रांग लागली होती.
-
ये जवानी है दिवानी, कॉकटेल, पिकू, छपाक, बाजीराव मस्तानी, रामलीला, कार्तिक कॉलिंग कार्तिक, हाऊसफुल अशा एकापाठोपाठ एक सिनेमांमध्ये दीपिकाने काम केलं.
-
बहुचर्चित पठाण सिनेमातही दीपिका होती, आता जवान या सिनेमातही ती झळकणार आहे.
ना रणबीर.. ना रणवीर दीपिकाला एके काळी आवडत होता हा ‘व्हिलन’
अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोण आवडत होतं माहित आहे का?
Web Title: Actress deepika padukone first love and crush on this actor scj