अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. २६ नोव्हेंबर १९७२ मध्ये त्याचा जन्म मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथे झाला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तो आईबरोबर राहायला लागला. कोकिलाबेन इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेमध्ये असताना त्याला अभिनयाबद्दलचे आकर्षण वाढू लागले. कॉलेज संपल्यानंतर मॉडेलिंग करता-करता त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम शोधायला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘प्यार, इश्क और मौहब्बत’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची सिनेविश्वामधील कारकीर्द सुरु झाली. त्याने ४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘रॉक ऑन’, ‘ओम शांती ओम’, ‘रावन’, ‘राजनीती’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. १९९८ मध्ये त्याने मेहर जेसियाशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. २०१८ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमिट्रिएड्स गरोदर असल्याची घोषणा केली. त्यांच्या मुलाचे नाव एरिक असे आहे. सुशांत राजपूत
आत्महत्याप्रकरणानंतर, अमली पदार्थ विरोधी पथकाने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरांवर छापे मारायला सुरुवात केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना काही गोळ्या सापडल्या होत्या. यांमध्ये अमली पदार्थ असल्याच्या संशय आल्याने त्यांनी अर्जुनला चौकशीसाठी बोलवले होते. Read More
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगितले आहे. गँगस्टर ते नेता असा प्रवास असलेल्या अरुण गवळीबरोबरच्या त्याच्या…
बॉलीवूडसह एकूणच चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्ड, डॉन, भाईगिरी यांचा वरचष्मा राहिला आहे. रामगोपाल वर्मासारख्या दिग्दर्शकाने तर अशा चित्रपटांच्या निर्मितीची फॅक्टरीच सुरू केली…
बॉलीवूडमधील लक्षवेधी तारे-तारकांची मोट बांधण्यात दिग्दर्शक होमी अदजानीया यशस्वी झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘फाइडिंग फेनी’ या विनोदी इंग्रजी चित्रपटात नसरूद्दीन…
अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. अर्जुनची मुलगी मायरा रामपाल लूकच्याबाबतीत तर बी-टाऊनमधील स्टारकिड्सलाही मागे टाकते. तिच्या…